आपली बातमी प्रसिद्ध करायची आहे?

स्थानिक बातमी किंवा जाहिरात हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा — जलद आणि विश्वासार्ह.

📲 आत्ताच संपर्क करा
  • Home
  • ब्लॉग
  • केंद्रशाळा सिरसंगी येथे पालक मेळावा उत्साहात
Image

केंद्रशाळा सिरसंगी येथे पालक मेळावा उत्साहात

सिरसंगी प्रतिनिधि

सिरसंगी : केंद्र शाळा सिरसंगी येथे पालक मेळाव्याचे आयोजन उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संतोष कांबळे होते, तर मुख्याध्यापक शिवाजी बोलके यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतराम केसरकर यांनी केले. मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले . मुख्याध्यापक शिवाजी बोलके यांनी शाळेत घेत असलेल्या विविध उपक्रमांची महिती दिली .

कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या स्वागतगीताने झाली. यावेळी विद्यार्थ्यांनी इंग्रजी भाषेत विविध कला, गुण व कौशल्यांचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. तसेच इयत्ता पहिली ते सातवीमधील शैक्षणिक क्षेत्रात यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. गोवा राज्य आदर्श शिक्षक शंकर बुडके यांच्या सौजन्याने घेण्यात आलेल्या हस्ताक्षर , चित्रकला , रांगोळी स्पर्धा विजेत्याना बक्षीस वितरण करण्यात आले , त्याचबरोबर शाळेतील प्रत्येक वर्गामध्ये {सीलिंग फॅन} पंखे बसवण्यासाठी संदीप कुंभार यांनी शाळेला देणगी दिली , त्याचबरोबर अग्निवीर वैभव कुंभार व माजी उपसरपंच सरिता सागर कुंभार यांनी शालेय पोषण आहार बनवण्यासाठी भांडी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला

यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य संतोष चौगले यांनी आपल्या मनोगतात गेल्या पाच वर्षात शाळेत केलेल्या विकासकामांची माहिती दिली . अध्यक्ष संतोष कांबळे यांनी पालकांना मार्गदर्शन करताना शाळेच्या विकासासाठी तसेच शाळा टिकवण्यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा असल्याचे सांगितले. पालकांनी शाळेच्या विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. इंग्लिश शाळेपेक्षा आमची मराठी शाळा एक नंबर अश्या शब्दात आजी कमल जाधव यांनी मुलीनी सादर केलेल्या कार्यक्रमावर अपली प्रतिक्रिया दिली

या कार्यक्रमास उत्तम कोकितकर लक्ष्मण कुंभार , श्री पाटील सर , उपाध्यक्ष प्रतीक्षा चौगले, सुप्रिया उत्तम कुंभार, रेखा चौगले, शीतल देसाई, सुप्रिया सागर कुंभार, माजी उपसरपंच पांडुरंग टकेकर , पत्रकार महादेव कुडव, सागर कुंभार, संतोष कुंभार, दीपक चौगले, विजय मयेकर , चाळू चौगले, रूपाली सुतार, विद्या पाटील, अनिल येलगार, सतीश कांबळे , बाबू कांबळे , संगीता होडंगे , शामल बुरूड, राजेंद्र येलगार यांच्यासह पालक, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शालेय पोषण आहार चालक गणेश मातवणकर यांनी भोजनाची सोय केली .आभार सुप्रिया पाटील यांनी मानले .

उपस्थित पालक
देणगीदार संदीप कुंभार यांचा सत्कार करताना मुख्याद्यापक शिवाजी बोलके

यशस्वी विध्यार्थीनींचा सत्कार करताना पालक व शिक्षक

संबंधित बातम्या

आदर्श हायस्कूल सिरसंगीमध्ये महात्मा गांधी , लाल बहादूर शास्त्री जयंती उत्साहात

सिरसंगी प्रतिनिधी आदर्श हायस्कूल सिरसंगी प्रशालेमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती…

ByByMahadev Kudav Oct 2, 2026

पावसासाठी प्रार्थना करणाऱ्या गणू कसेकर यांचा येमेकोंडकरांकडून सत्कार

सिरसंगी प्रतिनिधी गेल्या दीड महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने यमेकोंड परिसरात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. पावसाअभावी शेतकरी चिंतेत…

ByByMahadev Kudav Oct 2, 2026

वाटंगी येथील पंढरीनाथ पतसंस्थेला १२ लाख ३७ हजारांचा नफा

चेअरमन शिवाजी नांदवडेकर यांची माहिती सिरसंगी प्रतिनिधी वाटंगी येथील श्री पंढरीनाथ सहकारी पतसंस्थेची ३२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा…

ByByMahadev Kudav Sep 27, 2026

सिरसंगी, किणे, वाटंगी, कोळींद्रे परिसरात गणेशाचे उत्साहात स्वागत

सिरसंगी प्रतिनिधी :गणरायाच्या आगमनाने आजरा तालुक्यातील सिरसंगी, किणे, वाटंगी, कोळींद्रे परिसरात भक्तिमय आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.…

ByByMahadev Kudav Sep 14, 2026

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top