आपली बातमी प्रसिद्ध करायची आहे?

स्थानिक बातमी किंवा जाहिरात हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा — जलद आणि विश्वासार्ह.

📲 आत्ताच संपर्क करा
  • Home
  • ब्लॉग
  • केंद्र शाळा सिरसंगीतील सातवीच्या विद्यार्थ्याचा निरोप समारंभ
NIROP SAMARAMBH

केंद्र शाळा सिरसंगीतील सातवीच्या विद्यार्थ्याचा निरोप समारंभ


सिरसंगी प्रतिनिधी
केंद्र शाळा सिरसंगीतील सातवीच्या विद्यार्थ्याचा निरोप समारंभ व स्पर्धा परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा कमिटीचे अध्यक्ष श्री संतोष कांबळे होते.
सुरुवातीला सहावीच्या विध्यार्थीनीनी स्वागतगीताने मान्यवरांचे स्वागत केले, संतराम केसरकर यांनी सूत्रसंचलन केले तर प्रास्ताविकात उत्तम कोकीतकर यांनी सातवीतील विद्यार्थ्यांच्या सोबतच्या आठवणी कथन केल्या व त्यांना पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या. सातवीच्या विद्यार्थ्यानी यावेळी मुख्याध्यापक श्री शिवाजी बोलके सर यांनी विद्यार्थ्यांना मूलभूत मार्गदर्शन केले. तर शाळा समितीचे सदस्य महादेव कुडव यांनी मार्गदर्शन करताना सध्या मुलांनी मोबाईलच्या वापरापेक्षा पुस्तकाचे वाचन करण्याचे व जास्तीत जास्त स्पर्धा परीक्षांमध्ये सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेण्याचे आवाहन केले.
संतोष चौगुले यांनी इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या व भविष्यात चांगले यश मिळवून गावचे व आपल्या कुटुंबाचे नाव उज्ज्वल करण्याचा सल्ला दिला. यावेळी शाळा कमिटीचे अध्यक्ष संतोष कांबळे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांची कौतुक केले, मुलांनी मोबाईलचा अतिवापर टाळावा व अभ्यासाकडे लक्ष देण्याचे आवाहन केले. यावेळी ऋणानुबंध व मंथन परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी दीपक चौगुले, राजेंद्र मयेकर, सुप्रिया उत्तम कुंभार, शितल अमृतराव देसाई ,सुप्रिया पाटील मॅडम, संदीप कुंभार गणेश मातवनकर यांच्यासह शिक्षक स्टाफ उपस्थित होता. आभार लक्ष्मण कुंभार यांनी मानले.

यशस्वी विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करताना कामिटीचे अध्यक्ष संतोष कांबळे, मुख्याध्यापक श्री शिवाजी बोलके सर व इतर .

VI

संबंधित बातम्या

सिरसंगी, किणे, वाटंगी, कोळींद्रे परिसरात गणेशाचे उत्साहात स्वागत

सिरसंगी प्रतिनिधी :गणरायाच्या आगमनाने आजरा तालुक्यातील सिरसंगी, किणे, वाटंगी, कोळींद्रे परिसरात भक्तिमय आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.…

ByByMahadev Kudav Sep 14, 2026

तालुका शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये सिरसंगी हायस्कूलचे कबड्डी मध्ये वर्चस्व

सिरसंगी प्रतिनिधी आजरा तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत आदर्श हायस्कूल शिरसंगीच्या 14 वर्षे वयोगटातील मुलींच्या संघाने तालुक्यात प्रथम क्रमांक व…

ByByMahadev Kudav Sep 12, 2026

सिरसंगीतील सुतार कुटुंबाची चौथी पिढी गणेशमूर्ती कलेचा वारसा जपत आहे

सिरसंगी प्रतिनिधी सिरसंगी (ता. आजरा) येथील सुतार कुटुंबाची गणेशमूर्ती बनविण्याची परंपरा चौथ्या पिढीतही सुरू असून, दशरथ सुतार व…

ByByMahadev Kudav Sep 10, 2026

वाटंगीच्या गोकुळ दूध संस्थेला १४ लाखांचा वार्षिक नफा

सिरसंगी प्रतिनिधी वाटंगी येथील गोकुळ दूध संस्थेला यंदा १४ लाख रुपयांचा वार्षिक नफा झाला असल्याची माहिती संस्थापक अल्बर्ट…

ByByMahadev Kudav Sep 10, 2026

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top