आपली बातमी प्रसिद्ध करायची आहे?

स्थानिक बातमी किंवा जाहिरात हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा — जलद आणि विश्वासार्ह.

📲 आत्ताच संपर्क करा
  • Home
  • ब्लॉग
  • पेंद्रेवाडी, कोवाडे परिसरात अवकाळी पाऊसाचा तडाका
Image

पेंद्रेवाडी, कोवाडे परिसरात अवकाळी पाऊसाचा तडाका

नैसर्गिक आपत्तीमुळे 6 ते 7 लाखांचे नुकसान

सुभाष पोवार कोवाडे

आजरा तालुक्यातील पेंद्रेवाडी, कोवाडे परिसरात कालच्या अचानक आलेल्या पावसामुळे, लोकांची दयनीय अवस्था झाली. यामध्ये घरांची पडझड मोठ्या प्रमाणात झाली .
गुरुवारी आठच्या सुमारास अचानक अवकाळी पाऊस व जोरदार वारा चालू झाला याचबरोबर विजचा कडकडाट झाला. चक्रीवादळ व पाऊसामुळे घराच्या दरवाजे व ,खिडक्या यामधून पाणी घरामध्ये शिरल्यामुळे लोकांची एकच तारांबळ उडाली, यामध्ये लाईट नसल्यामुळे काहीच समजेना या नैसर्गिक आपत्तीमध्ये जनावरांची गोटे, पोल्ट्री फार्म, अनेक घरांची पडझण, घराची कवले, घराचे पत्रे, अनेक झाडाची पडझड झाली आहे. यातच लग्नसराई असल्यामुळे मंडपाचे पडदे, लाईट, स्पीकर बॉक्स याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामध्ये शेतकऱ्याचे ठेवलेली धान्य, कपडे, बिछाना, गाद्या, याचबरोबर वाऱ्यामुळे रस्त्यावरील झाडे कोलमोडून पडली होती महावितरण विभागाच्या लाईटच्या तारा तुटून मोठ्या प्रमाणात रस्त्यावर विखुरल्या होत्या.
सकाळी उठून जो तो आपल्या कामात मग्न होता. ‘कोण म्हणते माझे पत्रे उडाले तर कोण म्हणते माझे घर पडले,” गावात एकच तारांबळ उडाली होती. काजूची व फणसाची, केळी,आंब्याची झाडे पडल्यामुळे शेतकरी राजा हवालदिल झाला आहे , व्यवसायिकवाल्यांची ट्रॅक्टरची शेड, त्याचबरोबर गाडी लावलेल्या ठिकाणी झाडाचे मोठे फांदे पडल्यामुळे गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामध्ये तानाजी देसाई यांच्या घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे [ श्रीकांत दशरथ हुंदळेकर यांच्या पोल्ट्री फार्म वर काजूचे झाड पडून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. संभाजी देसाई यांच्या घराचे पत्रे निघून गेली आहेत महेश घोळसे यांच्या गाडीवर झाडाच्या फांद्या पडून गाडीचे नुकसान झाले आहे. रंजना बागडी यांच्या जनावरांचा गोठ्यावरी पत्रे उडून गोठा पूर्णपणे पडला आहे. अनेक लोकांनी एकत्र येऊन व सहाय्य करून एकोप्याचे दर्शन दाखवले.

महावितरण कर्मचाऱ्यांचे कार्य कौतुकास्पद
महावितरण कंपनीचे कर्मचारी मनोहर कुंभार, आजगेकर साहेब, प्रदीप हुंदळेकर व त्यांची संपूर्ण टीम यांनी अवघ्या दहा तासात लाईट चालू सुरू केली, त्यामुळे त्यांचे गावकरी वर्गातून कौतुक केले अहे .

श्रीकांत हुंदळेकर यांच्या पोल्ट्री फार्म वर उन्मळून पडलेले काजूचे झाड
तानाजी देसाई यांचे पडलेले घर
झाडामुळे विजेच्या वायरिंग पडून झालेले नुकसान

संबंधित बातम्या

आदर्श हायस्कूल सिरसंगीमध्ये महात्मा गांधी , लाल बहादूर शास्त्री जयंती उत्साहात

सिरसंगी प्रतिनिधी आदर्श हायस्कूल सिरसंगी प्रशालेमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती…

ByByMahadev Kudav Oct 2, 2026

पावसासाठी प्रार्थना करणाऱ्या गणू कसेकर यांचा येमेकोंडकरांकडून सत्कार

सिरसंगी प्रतिनिधी गेल्या दीड महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने यमेकोंड परिसरात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. पावसाअभावी शेतकरी चिंतेत…

ByByMahadev Kudav Oct 2, 2026

वाटंगी येथील पंढरीनाथ पतसंस्थेला १२ लाख ३७ हजारांचा नफा

चेअरमन शिवाजी नांदवडेकर यांची माहिती सिरसंगी प्रतिनिधी वाटंगी येथील श्री पंढरीनाथ सहकारी पतसंस्थेची ३२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा…

ByByMahadev Kudav Sep 27, 2026

सिरसंगी, किणे, वाटंगी, कोळींद्रे परिसरात गणेशाचे उत्साहात स्वागत

सिरसंगी प्रतिनिधी :गणरायाच्या आगमनाने आजरा तालुक्यातील सिरसंगी, किणे, वाटंगी, कोळींद्रे परिसरात भक्तिमय आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.…

ByByMahadev Kudav Sep 14, 2026

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top