आपली बातमी प्रसिद्ध करायची आहे?

स्थानिक बातमी किंवा जाहिरात हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा — जलद आणि विश्वासार्ह.

📲 आत्ताच संपर्क करा
  • Home
  • ब्लॉग
  • हिरण्यकेशी नदीपात्रात मामा – भाच्याचा बुडून मृत्यू
Image

हिरण्यकेशी नदीपात्रात मामा – भाच्याचा बुडून मृत्यू

कोवाडे प्रतिनिधी

निवृत्तीच्या कार्यक्रमाला आलेल्या मामा – भाच्याचा कोवाडे लगत हिरण्यकेशी नदीपात्रात बुडून मृत्यू झाला.
पुढील माहिती सविस्तर अशी कि मामा सुनील विष्णू सुतार वय 50 रा. कोवाडे व भाचा प्रवीण पांडुरंग सुतार वय 36 राहणार वाळकी तालुका चिकोडी हे दोघे हिरलगे येथे आले होते.
प्रवीण पांडुरंग सुतार हे आपल्या हिरलगे येथे सासरवाडीला सासर्‍यांच्या रिटायरमेंटच्या कार्यक्रमाला आले होते, या कार्यक्रमाला आप्तेष्ट व मित्रमंडळी गोळा झाली होती दिनांक 11 /5/26 रोजी दुपारी जेवण झाल्यानंतर मामाला कोवाडेला सोडण्यासाठी गाडीवरून हिरलगे बंधाऱ्यालगत आले, गाडी नदी काठावर लावून मामा व भाचा बंधाऱ्यालगत पाण्यातून कोवाडे येत होते. पाण्याचा अंदाज आला नसल्यामुळे दोघेही नदी पात्रात बुडाले दुपारी अडीचच्या दरम्यान आजूबाजूला कोणीही नसल्यामुळे त्यांना वाचवण्यासाठी कुणाचीही मदत मिळाली नाही , त्यामुळे दोघांचाही बुडून मृत्यू झाला. मामा सुनील विष्णू सुतार त्यांच्या पश्चात आई,बायको, भाऊ, मुलगा व मुलगी आहे. भाचा प्रवीण पांडुरंग सुतार यांच्या पश्चात आई वडील व पत्नी व दोन मुली आहेत वर्दी दीपक सुतार यांनी दिली, पोलीस हवालदार श्री साजिद सिकलदार यांनी तपासणी केली

संबंधित बातम्या

आदर्श हायस्कूल सिरसंगीमध्ये महात्मा गांधी , लाल बहादूर शास्त्री जयंती उत्साहात

सिरसंगी प्रतिनिधी आदर्श हायस्कूल सिरसंगी प्रशालेमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती…

ByByMahadev Kudav Oct 2, 2026

पावसासाठी प्रार्थना करणाऱ्या गणू कसेकर यांचा येमेकोंडकरांकडून सत्कार

सिरसंगी प्रतिनिधी गेल्या दीड महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने यमेकोंड परिसरात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. पावसाअभावी शेतकरी चिंतेत…

ByByMahadev Kudav Oct 2, 2026

वाटंगी येथील पंढरीनाथ पतसंस्थेला १२ लाख ३७ हजारांचा नफा

चेअरमन शिवाजी नांदवडेकर यांची माहिती सिरसंगी प्रतिनिधी वाटंगी येथील श्री पंढरीनाथ सहकारी पतसंस्थेची ३२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा…

ByByMahadev Kudav Sep 27, 2026

सिरसंगी, किणे, वाटंगी, कोळींद्रे परिसरात गणेशाचे उत्साहात स्वागत

सिरसंगी प्रतिनिधी :गणरायाच्या आगमनाने आजरा तालुक्यातील सिरसंगी, किणे, वाटंगी, कोळींद्रे परिसरात भक्तिमय आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.…

ByByMahadev Kudav Sep 14, 2026

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top