आपली बातमी प्रसिद्ध करायची आहे?

स्थानिक बातमी किंवा जाहिरात हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा — जलद आणि विश्वासार्ह.

📲 आत्ताच संपर्क करा
  • Home
  • स्पोर्ट्स
  • व्यंकटरावच्या साधना व मधुरा यांची राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड
Image

व्यंकटरावच्या साधना व मधुरा यांची राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड

सिरसंगी ची कन्या मधुरा प्रकाश दळवी यांची राज्यस्थरिय कबड्डी स्पर्धेसाठी निवड झाल्या बद्दल आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

आजरा : येथील व्यंकटराव कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, आजरा येथील कु. मधुरा प्रकाश दळवीकु. साधना महेश होसुरकर यांची नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथे होणाऱ्या राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

तसेच व्यंकटराव महाविद्यालयाने कबड्डी खेळातील आपले वर्चस्व कायम राखत नुकत्याच करवीर तालुक्यातील कोथळी येथे झालेल्या राज्यस्तरीय खुल्या महिला कबड्डी स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली. या स्पर्धेत व्यंकटराव महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी चुरशीचा सामना करत शेवटच्या क्षणापर्यंत लढा देत द्वितीय क्रमांक मिळविला.

कबड्डी क्षेत्रात सातत्यपूर्ण सराव करत विद्यार्थिनींनी मिळवलेल्या या उज्ज्वल यशाबद्दल व्यंकटराव शिक्षण संकुलाचे अध्यक्ष श्री. जयवंतराव शिंपी तसेच संचालक मंडळाने खेळाडूंचे कौतुक करून अभिनंदन केले.

यशस्वी महिला कबड्डी खेळाडू व मार्गदर्शक (एन.आय.एस.) शिक्षक पी. आर. तेरसेकु. पी. एल. सासुलकर यांचा प्रत्यक्ष मैदानावर येऊन संस्थेचे संचालक व आजऱ्यातील प्रसिद्ध उद्योगपती श्री. सचिन (भैय्या) शिंपी यांनी सत्कार केला.

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. एस. व्ही. शेळके तसेच प्रभारी प्राचार्य श्री. सी. एस. पन्हाळकर उपस्थित होते.

संबंधित बातम्या

हंदेवाडीकरांनी दिले जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

आजरा पंचायत समिति प्रशासनाकडून तक्रारीकडे दुर्लक्ष – ग्रामस्थांचा आरोप सिरसंगी प्रतिनिधी हंदेवाडी तालुका आजरा येथील विठ्ठल रुक्मिणी वसाहतीतील…

ByByMahadev Kudav May 29, 2026

चंदगड – मुंबई एसटी सेवेमुळे अनेक वर्षांची प्रतीक्षा संपली: प्रकाश पाटकर

चंदगड प्रतिनिधी पारगड–चंदगड–मुंबई व चंदगड–कल्याण या एस.टी. बस सेवा पुन्हा सुरू झाली अन चंदगड तालुक्यातील नागरिकांची अनेक वर्षापासूनची…

ByByMahadev Kudav May 29, 2026

हंदेवाडी येथील गावांतर्गत रस्ते पावसाळ्यापूर्वी पूर्ण करा

सिरसंगी प्रतिनिधी हंदेवाडी तालुका आजरा येथील विठ्ठल रुक्मिणी वसाहतीतील महात्मा गांधी रोजगार हमी योजना मधून मंजूर झालेल्या रस्त्यांची…

ByByMahadev Kudav May 23, 2026

हंदेवाडीच्या दिनकर कांबळे यांचा आजरा पं. समिती मध्ये सत्कार

सिरसंगी प्रतिनिधी हंदेवाडी ता. आजरा येथील दिनकर महादेव कांबळे यांचा पंचायत समिती आजरा येथे सत्कार करण्यात आला. अध्यक्ष…

ByByMahadev Kudav May 18, 2026

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top