आपली बातमी प्रसिद्ध करायची आहे?

स्थानिक बातमी किंवा जाहिरात हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा — जलद आणि विश्वासार्ह.

📲 आत्ताच संपर्क करा
  • Home
  • ब्लॉग
  • सिरसंगीत रवळनाथ मूर्ती प्राणप्रतिष्ठापणा कार्यक्रमाला उत्साहात प्रारंभ
RAWALANATH MIRAWNUK

सिरसंगीत रवळनाथ मूर्ती प्राणप्रतिष्ठापणा कार्यक्रमाला उत्साहात प्रारंभ

कलश व पालखी मिरवणूकीत गुलालची उधळण , लहान थोर मंडळींचा सहभाग

सिरसंगी प्रतिनिधी

सिरसंगीत रवळनाथ मूर्ती प्राणप्रतिष्ठापणा कार्यक्रमाला उत्साहात प्रारंभ झाला असून सकाळी 9 वाजता रवळनाथ मूर्तीची रथातूनमिरवणूक काढण्यात आली. रथाला झेंडूच्या फुलांनी सजवले होते. पौराहित्य वेदशास्त्रसंपन्न डॉ हिरेमठ व सहकारी व वेदमूर्ती बाळासाहेब सुतार महाराज यांचे मंत्रघोषात श्री रवळनाथ मूर्तीला रथामध्ये बसवण्यात आले . मिरवणूकिमध्ये गावातील महिला हरिपाठ मंडळ भजनी मंडळ वारकरी मंडळीनि सहभाग घेतला होता , तसेच प्राथमिक शाळेतील विध्यार्थ्यानी लेझीम पथकाद्वारे उपस्थितांचे माने जिंकली . या मिरवणूकीत सुमारे ८०० महिलांनी कलश व दुरडी घेऊन सहभाग घेतला होता . तर हलगिच्या वाद्यामुळे युवकापासून वृद्धापर्यंत सर्वांनी नाचगाण्याचा आस्वाद घेतला .मिरवणूक महादेव मंदिर ते विठ्ठल रखुमाई मंदिर करून गोरोबा काका मंदिर ते महालक्ष्मी मंदिर करून दत्त मंदिर ते लक्ष्मी गल्ली व गोठणदेव गल्ली अशी मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीमध्ये गुलालची उधळण करण्यात आली. गल्लीतून जागोजागी थंड पेय , ताक , चहा, मट्टा यांची सोय करण्यात आली होती . सकाळी 9 वाजता निघालेली मिरवणूक दुपारी 2 वाजता मंदिरमध्ये पोहचली . त्यानंतर सर्व माहेरवाशिनी व सुहाशिनीची ओटी भरण्यात आली. त्यानंतर महाप्रसाद वाटण्यात आला . डॉ हिरेमठ व सहकारी यांचे मंत्रघोषात पुढील विधी करण्यात आले .

मिरवणुकीत सहभागी झालेल्या महिला
भाविकाना जागोजागी थंड पेयाची , ताक , पाण्याची सोय केली होती .

संबंधित बातम्या

केंद्रशाळा सिरसंगी येथे पालक मेळावा उत्साहात

सिरसंगी प्रतिनिधि सिरसंगी : केंद्र शाळा सिरसंगी येथे पालक मेळाव्याचे आयोजन उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संतोष कांबळे…

ByByMahadev Kudav Aug 29, 2026

रवळनाथ विकास सेवा संस्थेला 2 लाख 45 हजार रुपयांचा नफा

चेअरमन मधुकर येलगार यांची माहिती; वार्षिक सर्व साधारण सभा सिरसंगी प्रतिनिधी सिरसंगी येथील श्री रवळनाथ विकास सेवा संस्थेला…

ByByMahadev Kudav Aug 28, 2026

शिरसंगी आदर्श हायस्कूलमध्ये पार पडला विध्यार्थी गुणगौरव सोहळा

सिरसंगी प्रतिनिधी आदर्श हायस्कूल शिरसंगी प्रशालेमध्ये एसएससी मार्च 2026 परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा पार…

ByByMahadev Kudav Aug 22, 2026

श्रमिक तरुण मंडळाच्या अध्यक्षपदी महादेव सुतार

सिरसंगी प्रतिनिधी किणे.येथील श्रमिक तरुण मंडळांची सामाजिक कार्यकर्ते श्री महादेव सुतार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मंडळाच्या अध्यक्षपदी पुन्हा…

ByByMahadev Kudav Aug 21, 2026

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top