आपली बातमी प्रसिद्ध करायची आहे?

स्थानिक बातमी किंवा जाहिरात हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा — जलद आणि विश्वासार्ह.

📲 आत्ताच संपर्क करा
  • Home
  • विशेष
  • केंद्रप्रमुख आनंदराव भादवणकर यांचा सेवापूर्ती समारंभ उत्साहात 
Image

केंद्रप्रमुख आनंदराव भादवणकर यांचा सेवापूर्ती समारंभ उत्साहात 

सिरसंगी प्रतिनिधी : गवसे-उमगाव, ता. चंदगड येथील केंद्रप्रमुख श्री. आनंदराव शंकर भादवणकर यांच्या ३८ वर्षे ६ महिने ९ दिवसांच्या प्रदीर्घ शैक्षणिक सेवेनंतर सेवानिवृत्तीनिमित्त आयोजित सेवापूर्ती समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी शिक्षणाधिकारी मा. आनंदराव जोशिलकर होते. प्रमुख उपस्थितांमध्ये आजऱ्याच्या माजी सभापती मा. जयश्री गाडे, भादवणच्या सरपंच मा. माधुरी गाडे, आजरा पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी मा. दिनेश शेटे, माजी शिक्षण विस्ताराधिकारी मा. जी. व्ही. दैठणकर, माजी शिक्षण विस्ताराधिकारी मा. शिवाजी गिलबिले आणि भाजपचे उपाध्यक्ष मा. संतोष चौगुले यांचा समावेश होता.श्री. आनंदराव भादवणकर यांनी २१ डिसेंबर १९८७ रोजी आपल्या शैक्षणिक सेवेला प्रारंभ केला. आपल्या प्रदीर्घ सेवाकाळात त्यांनी जाधेवाडी (आजरा), भादवण (आजरा), बी.आर.सी. आजरा, बुझवडे (चंदगड), चितळे (आजरा), सिरसंगी आणि कुमार (चंदगड) येथे विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. त्यांनी अध्यापक, गटसमन्वयक, विषय शिक्षक आणि मुख्याध्यापक म्हणून काम केले. त्यानंतर गवसे-उमगाव, ता. चंदगड येथे केंद्रप्रमुख म्हणून त्यांनी सेवा बजावली. ३० जून २०२६ रोजी ते सेवानिवृत्त झाले.या समारंभास शिक्षक समिती परिवार, शिक्षक संघ आजरा (पाटील गट), शिक्षक संघ आजरा (थोरात गट), पुरोगामी संघटना परिवार आजरा, पदवीधर शिक्षक संघटना आजरा आणि कास्ट्राईब संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. तसेच शिव कॉलनी, रवळनाथ कॉलनी, रामतीर्थ कॉलनी, बळीराम देसाई कॉलनीतील मित्रमंडळी, भादवण व सिरसंगी येथील ग्रामस्थ आणि गवसे-उमगाव, चंदगड व सिरसंगी केंद्रातील शिक्षकांनी उपस्थित राहून भादवणकर यांना शुभेच्छा दिल्या.यावेळी सुनील शिंदे, शिवाजी बोलके, विनायक आमणगी, धनाजी पाटील, विनायक प्रधान, प्रवीण साळुंखे, जनार्दन नेऊगरे, मायकेल फर्नांडिस, रवी दोरुगडे, धनाजी रावण, रावसाहेब देसाई आणि राजाराम नेवरेकर यांच्यासह अनेक मान्यवर व हितचिंतक उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक बळवंत शिंत्रे यांनी केले. सूत्रसंचालन एकनाथ गिलबिले व सदाशिव दिवेकर यांनी केले, तर आभार मयूर भादवणकर यांनी मानले.

संबंधित बातम्या

मोरेवाडीत हत्तीचा धुमाकूळ; सिरसंगी परिसरात बिबट्याची दहशत शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

सिरसंगी प्रतिनिधी : आजरा तालुक्यातील मोरेवडी धनगरवाडा येथे हत्तीने धुमाकूळ घातला असून, भातपीक उसपीक व केळी बागेची नासधूस…

ByByMahadev Kudav Oct 10, 2026

वाटंगी येथील पंढरीनाथ पतसंस्थेला १२ लाख ३७ हजारांचा नफा

चेअरमन शिवाजी नांदवडेकर यांची माहिती सिरसंगी प्रतिनिधी वाटंगी येथील श्री पंढरीनाथ सहकारी पतसंस्थेची ३२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा…

ByByMahadev Kudav Sep 27, 2026

सिरसंगी, किणे, वाटंगी, कोळींद्रे परिसरात गणेशाचे उत्साहात स्वागत

सिरसंगी प्रतिनिधी :गणरायाच्या आगमनाने आजरा तालुक्यातील सिरसंगी, किणे, वाटंगी, कोळींद्रे परिसरात भक्तिमय आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.…

ByByMahadev Kudav Sep 14, 2026

सिरसंगीतील सुतार कुटुंबाची चौथी पिढी गणेशमूर्ती कलेचा वारसा जपत आहे

सिरसंगी प्रतिनिधी सिरसंगी (ता. आजरा) येथील सुतार कुटुंबाची गणेशमूर्ती बनविण्याची परंपरा चौथ्या पिढीतही सुरू असून, दशरथ सुतार व…

ByByMahadev Kudav Sep 10, 2026

केंद्र शाळा सिरसंगी येथे पाककृती स्पर्धेत महिलांचा उत्स्फूर्त सहभाग

सिरसंगी प्रतिनिधी प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत केंद्र शाळा सिरसंगी येथे महिला पालकांसाठी पाककृती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.…

ByByMahadev Kudav Sep 9, 2026

मोरेवाडी धनगरवाड्यात बिबट्याचा धुमाकूळ; तीन शेळ्यांचा फडशा दोन शेळ्या गायब

सिरसंगी प्रतिनिधी आजरा तालुक्यातील मोरेवाडी पैकी धनगरवाडा येथे बिबट्याने तीन शेळ्यांचा फडशा पाडल्याची घटना बुधवारी सायंकाळी सुमारे ४…

ByByMahadev Kudav Sep 9, 2026

तीन दशकांपासून गणेशमूर्ती घडविण्याची परंपरा जपणारे सिरसंगीचे विष्णु कुंभार

सिरसंगी प्रतिनिधी गणेशोत्सव म्हटले की भक्ती, उत्साह आणि सजावटीसोबत गणेशमूर्तीला विशेष महत्त्व असते. आकर्षक, सुबक आणि मनमोहक गणेशमूर्ती…

ByByMahadev Kudav Sep 8, 2026

वाटंगी शाळेत देसाई कुटुंबियाकडुन आजोबांच्या ‘बाराव्या’ दिवशी शैक्षणिक साहित्य वाटप

सिरसंगी प्रतिनिधी वाटंगी येथील १०७ वर्षांचे ज्येष्ठ नागरिक कै. गणपतराव कृष्णा देसाई यांच्या बाराव्या दिवसाच्या कार्याचे औचित्य साधून…

ByByMahadev Kudav Sep 4, 2026

रवळनाथ विकास सेवा संस्थेला 2 लाख 45 हजार रुपयांचा नफा

चेअरमन मधुकर येलगार यांची माहिती; वार्षिक सर्व साधारण सभा सिरसंगी प्रतिनिधी सिरसंगी येथील श्री रवळनाथ विकास सेवा संस्थेला…

ByByMahadev Kudav Aug 28, 2026

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top