आपली बातमी प्रसिद्ध करायची आहे?

स्थानिक बातमी किंवा जाहिरात हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा — जलद आणि विश्वासार्ह.

📲 आत्ताच संपर्क करा
  • Home
  • ब्लॉग
  • वाटंगीच्या देसाई कुटुंबियाकडून पर्यावरणपुरक रक्षाविसर्जन
Image

वाटंगीच्या देसाई कुटुंबियाकडून पर्यावरणपुरक रक्षाविसर्जन

सिरसंगी प्रतिनिधी
वाटंगीच्या देसाई कुटुंबियाकडून पारंपरिक रक्षाविसर्जनला फाटा देत पर्यावरण दिनाचे औचित्य साधून शेतात वृक्षारोपण करून समाजासमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे . वाटंगी येथील श्री रवळनाथ दूध संस्थेचे सचिव अजित नानासो देसाई यांच्या मातोश्री व रवळनाथ उद्योग समूहाचे प्रमुख विजय बाबुराव देसाई यांच्या काकी श्रीमती नर्मदा नानासो देसाई यांचे वयाच्या 103 वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले , तिसऱ्या दिवसाच्या कार्यानिमित्त पारंपरिक रक्षाविसर्जन नदीमध्ये न करता देसाई कुटुंबियानी राख शेतामध्ये पसरून त्याठिकाणी आंब्याची झाडांची लागवड केली. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी वृक्षारोपणाचा उपक्रम राबविण्यात आला. देसाई कुटुंबीयांनी आईच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करत लावलेले हे वृक्ष तिच्या प्रेम, संस्कार आणि जीवनमूल्यांचे जिवंत स्मारक ठरतील. तिच्या स्मृती चिरंतन राहाव्यात आणि निसर्गाचे संवर्धन व्हावे, हीच या उपक्रमामागील भावना असल्याचे मत अजित देसाई व विजयराव देसाई यांनी सांगितले . उत्तरकार्यादिवशी झाडे वाटप करणार असल्याचे देसाई कुटुंबियाकडून सांगण्यात आले .

संबंधित बातम्या

आदर्श हायस्कूल सिरसंगीमध्ये महात्मा गांधी , लाल बहादूर शास्त्री जयंती उत्साहात

सिरसंगी प्रतिनिधी आदर्श हायस्कूल सिरसंगी प्रशालेमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती…

ByByMahadev Kudav Oct 2, 2026

पावसासाठी प्रार्थना करणाऱ्या गणू कसेकर यांचा येमेकोंडकरांकडून सत्कार

सिरसंगी प्रतिनिधी गेल्या दीड महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने यमेकोंड परिसरात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. पावसाअभावी शेतकरी चिंतेत…

ByByMahadev Kudav Oct 2, 2026

वाटंगी येथील पंढरीनाथ पतसंस्थेला १२ लाख ३७ हजारांचा नफा

चेअरमन शिवाजी नांदवडेकर यांची माहिती सिरसंगी प्रतिनिधी वाटंगी येथील श्री पंढरीनाथ सहकारी पतसंस्थेची ३२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा…

ByByMahadev Kudav Sep 27, 2026

सिरसंगी, किणे, वाटंगी, कोळींद्रे परिसरात गणेशाचे उत्साहात स्वागत

सिरसंगी प्रतिनिधी :गणरायाच्या आगमनाने आजरा तालुक्यातील सिरसंगी, किणे, वाटंगी, कोळींद्रे परिसरात भक्तिमय आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.…

ByByMahadev Kudav Sep 14, 2026

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top