आपली बातमी प्रसिद्ध करायची आहे?

स्थानिक बातमी किंवा जाहिरात हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा — जलद आणि विश्वासार्ह.

📲 आत्ताच संपर्क करा
  • Home
  • दैनिक बातम्या
  • सिरसंगी आदर्श हायस्कूलमध्ये दहावीच्या मुलांना परीक्षेसाठी शुभेच्छा
highschool shirsangi

सिरसंगी आदर्श हायस्कूलमध्ये दहावीच्या मुलांना परीक्षेसाठी शुभेच्छा

सिरसंगी प्रतिनिधी

सिरसंगी येथील आदर्श हायस्कूल मधील दहावीच्या मुलांना मार्च 2026 च्या परीक्षेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आजरा महाल शिक्षण मंडळाचे ज्येष्ठ संचालक श्री पांडुरंग जाधव होते तर प्रमुख पाहुणे म्हणून आजरा महाल शिक्षण मंडळाचे संचालक माननीय श्री सुधीर जाधव उपस्थित होते. त्यावेळी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक श्री पाटील सर यांनी केले.

यावेळी इयत्ता आठवी इयत्ता नववीतील विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी सौ पाटील मॅडम, श्री विठ्ठल चौगुले सर यांनी आपल्या मनोगतामध्ये विद्यार्थ्यांना परीक्षे संदर्भात सूचना दिल्या.

अध्यक्षीय मनोगतात श्री पांडुरंग पाटील यांनी मुलांना परीक्षेच्या वेळी कोणती काळजी घ्यावी आरोग्य कसे सांभाळावे या संदर्भात बहुमोल मार्गदर्शन केले.
यावेळी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी शाळेकरिता अहुजा कंपनीचे स्पीकर सेट शाळेला भेट दिली.
या कार्यक्रमाचे प्रस्ताविक श्री मदन देसाई यांनी केले तर आभार श्री आनंदा प्रभू यांनी मांडले

संबंधित बातम्या

रस्ते डांबरीकरणसंदर्भात हंदेवाडीकरांनी दिले आमदारांना निवेदन

सिरसंगी प्रतिनिधी हंदेवाडी तालुका आजरा येथील नवीन वसाहत म्हणजेच वाढीव गावठाण अंतर्गत रस्ते खडीकरण व डांबरीकरण करावेत यासाठी…

ByByMahadev Kudav Jul 15, 2026

एस एस हायस्कूलमध्ये माजी विद्यार्थी व गुणवंत विद्यार्थी गुण गौरव समारंभ

सिरसंगी प्रतिनिधी एस एस हायस्कूल नेसरी येथे माजी विद्यार्थी गुणगौरव समारंभ संपन्न झाला या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शिक्षण समिती…

ByByMahadev Kudav Jul 4, 2026

श्रमिक सेवा तरुण मंडळातर्फे किणे येथे वृक्षारोपण

सिरसंगी प्रतिनिधी श्रमिक सेवा तरुण मंडळ व वनविभागातर्फे खास वटपोर्णिमानिमित्त किणे येथे वृक्षारोपण करण्यात आले . यावेळी वन…

ByByMahadev Kudav Jul 1, 2026

सिरसंगी येथे लोकराजा छ .शाहू महाराज जयंती साजरी

सिरसंगी प्रतिनिधी सिरसंगी येथे लोकराजा छ .शाहू महाराज जयंती उस्ताहात साजरी करण्यात आली .सिरसंगी ग्रामपंचायत कार्यालयात माजी उपसरपंच…

ByByMahadev Kudav Jun 26, 2026

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top