सिरसंगी प्रतिनिधी
हंदेवाडी ता. आजरा येथील दिनकर महादेव कांबळे यांचा पंचायत समिती आजरा येथे सत्कार करण्यात आला. अध्यक्ष स्थानी सभापती सौ.जयश्री गाडे होत्या. डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना 2023,2024 अंतर्गत कृषी सिंचनासाठी लाभ घेण्यात आल्याबद्दल दिनकर महादेव कांबळे यांचा मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.यावेळी तालुकास्तरीय नऊ शेतकऱ्यांचा समावेश होता.दिनकर कांबळे यांना यावेळी भारतीय संविधानाची उद्देशिका फ्रेम देउन सत्कार करण्यात आला.स्वागत व प्रास्ताविक सहायक बी डी ओ दिनेश शेट्ये यांनी केले.यावेळी उप सभापती यशोदा पोवार ,
जी प सदस्य सुधीर देसाई,जी प सदस्य शिरीष देसाई, पंचायत समिती सदस्य विकास चोथे व पंचायत समिती सदस्य समीर पारदे यांच्यासह सर्व मान्यवर व तालुकास्तरीय व पंचायत समिती चे सर्व खातेप्रमुख उपस्थित होते.आभार बी डी ओ सुभाष सावंत यांनी मानले.सदर पुरस्कारासाठी दिनकर कांबळे यांना पत्नी सौ. शालू कांबळे,मुलगी सौ शोभा शाम कांबळे रा.गोकाक,नातवंडे प्रिताली व प्रणय शाम कांबळे, मुक्ता किशोर कांबळे यांचे प्रोत्साहन मिळाले.यावेळी पत्रकार पुंडलिक सुतार यांच्या हस्ते ही सत्कार करण्यात आला.













