आपली बातमी प्रसिद्ध करायची आहे?

स्थानिक बातमी किंवा जाहिरात हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा — जलद आणि विश्वासार्ह.

📲 आत्ताच संपर्क करा
  • Home
  • ब्लॉग
  • माजी सभापती अल्बर्ट डिसोझा यांना पुत्रशोक
Image

माजी सभापती अल्बर्ट डिसोझा यांना पुत्रशोक

सिरसंगी प्रतिनिधी

आजरा तालुक्याचे माजी सभापती अल्बर्ट डिसोजा यांचे चिरंजीव नेल्सन डिसोजा वय 30 यांचा ह्रदय विकाराच्या धक्क्याने दुःखद निधन झाले, लग्नाच्या पहिल्या वाढदिवशीच दुःखद घटना घडल्यामुळे वाटंगी गावावर व डिसोजा कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे . नेल्सन हे चेन्नई येथे खाजगी कंपनीत उच्च पदावर कार्यरत होते . नेल्सन हे गोवा कबड्डी संघाचे कप्तान म्हणून प्रतिनिधीत्व करत होते, गेले आठ दिवसापासून गावी वाटंगी येथे सुट्टीच्या निमित्ताने आले होते. सोमवारी उपचारासाठी गडहिंग्लज येथील खाजगी दवाखान्यात दाखल केले असता तेथेच त्यांना हृदय विकाराचा तीव्र धक्का आला , त्या नंतर त्यांना पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथे नेण्यात आले पण मंगळवार दि 12 रोजी त्यांचे दुःखद निधन झाले, त्यांच्या पश्चात पत्नी , तीन विवाहित बहिणी आई-वडील असा परिवार आहे, अंत्यसंस्कारविधी बुधवार दि १३ रोजी सायंकाळी ४:०० वाजता, वाटंगी येथील सेंट सेबॅस्टियन चर्चमध्ये पार पडेल.

संबंधित बातम्या

आदर्श हायस्कूल सिरसंगीमध्ये महात्मा गांधी , लाल बहादूर शास्त्री जयंती उत्साहात

सिरसंगी प्रतिनिधी आदर्श हायस्कूल सिरसंगी प्रशालेमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती…

ByByMahadev Kudav Oct 2, 2026

पावसासाठी प्रार्थना करणाऱ्या गणू कसेकर यांचा येमेकोंडकरांकडून सत्कार

सिरसंगी प्रतिनिधी गेल्या दीड महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने यमेकोंड परिसरात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. पावसाअभावी शेतकरी चिंतेत…

ByByMahadev Kudav Oct 2, 2026

वाटंगी येथील पंढरीनाथ पतसंस्थेला १२ लाख ३७ हजारांचा नफा

चेअरमन शिवाजी नांदवडेकर यांची माहिती सिरसंगी प्रतिनिधी वाटंगी येथील श्री पंढरीनाथ सहकारी पतसंस्थेची ३२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा…

ByByMahadev Kudav Sep 27, 2026

सिरसंगी, किणे, वाटंगी, कोळींद्रे परिसरात गणेशाचे उत्साहात स्वागत

सिरसंगी प्रतिनिधी :गणरायाच्या आगमनाने आजरा तालुक्यातील सिरसंगी, किणे, वाटंगी, कोळींद्रे परिसरात भक्तिमय आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.…

ByByMahadev Kudav Sep 14, 2026

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top