आपली बातमी प्रसिद्ध करायची आहे?

स्थानिक बातमी किंवा जाहिरात हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा — जलद आणि विश्वासार्ह.

📲 आत्ताच संपर्क करा
  • Home
  • ब्लॉग
  • शिरसंगी येथील श्री गोठणदेव प्रवेशद्वाराचे माजी आम. राजेश पाटील यांच्या हस्ते उद्घाटन
Image

शिरसंगी येथील श्री गोठणदेव प्रवेशद्वाराचे माजी आम. राजेश पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

सिरसंगी प्रतिनिधी

शिरसंगी येथील कै शंकर लक्ष्मण साठपे यांचे स्मरणार्थ श्री मारुती शंकर साठपे यांच्या देणगीतून उभारलेल्या श्री गोठणदेव प्रवेशद्वाराचे माजी आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी झालेल्या कार्यक्रमात श्री पाटील यांनी कै. शंकर साठपे मामां अशिक्षित असूनही त्यांच्या समाजकार्यासाठी केलेल्या योगदानाबद्दल आठवणी व्यक्त केल्या, कै. साटपे मामा हे त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत कै. नरसिंगराव पाटील यांचे सच्चे कार्यकर्ते होते, साठपे कुटुंबीयांची असलेली निष्ठा व श्रद्धा आमच्या राजकीय कारकिर्दीमध्ये आम्हाला मार्गदर्शन ठरेल आणि या भागाच्या विकासाला गती देण्याचे काम आमच्या हातून घडेल अशी प्रतिपादन राजेश पाटील यांनी यावेळी केले. सरपंच संदीप चौगुले यांनी माजी आमदार राजेश पाटील यांचा सत्कार केला.
स्वागत आजरा कारखान्याचे व्हा चेअरमन सुभाषराव देसाई यांनी केले. आपल्या प्रस्ताविकात देसाई यांनी सिरसंगी गावातील श्री गोठनदेव महाकाय वटवृक्षाला क वर्ग पर्यटन स्थळ दर्जा मिळाला असून या ठिकाणी स्वागत कमानिची नितांत गरज होती, ती गरज ओळखून लंडनमध्ये उद्योजक असणारे श्री मारुती शंकर साठपे यांनी सुमारे आठ लाख खर्च करू सदर स्वागत कमान उभी केल्याचे सांगितले.
यावेळी आजरा कारखाना संचालक दिगंबर देसाई यांनी माजी आमदार राजेश पाटील यांनी चंदगड मतदारसंघात सोळाशे कोटी रुपयांचा निधी आणून चंदगड मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलला आहे, पाटील यांनी शिरसंगी येथील महाकाय वटवृक्षासाठी निधी आणून विकासाला हातभार लावावा असे आवाहन केले, यावेळी जयवंत सुतार यांनी कै. शंकर साठपे यांच्या आठवणी सांगितल्या, त्याचबरोबर सिरसंगी बस स्थानकावर भाजी मंडई उभारणीसाठी माजी आमदार राजेश पाटील यांनी सुद्धा सहकार्य करावे असे मागणी केली. यावेळी श्री मारुती शंकर साटपे यांचा शिरसंगी ग्रामस्थांकडून सत्कार करण्यात आला. यावेळी पांडुरंग शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जनता बँकेचे चेअरमन मुकुंद दादा देसाई, बाबुराव बुडके, मधुकर यलगार, सि आर देसाई , जयसिंग थोरवत ,संतोष चौगुले शिवाजी होडगे सुरेश वांद्रे, प्रकाश साठपे दत्तात्रय येलगार, शंकर बुडके दत्तात्रय देसाई, रामचंद्र येलगार अशोक चौगुले वसंत देवळे, चाळू सावंत, रामचंद्र सावंत , सुरेश येलगार त्यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते आभार महेश साठपे यांनी मानले.

संबंधित बातम्या

आदर्श हायस्कूल सिरसंगीमध्ये महात्मा गांधी , लाल बहादूर शास्त्री जयंती उत्साहात

सिरसंगी प्रतिनिधी आदर्श हायस्कूल सिरसंगी प्रशालेमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती…

ByByMahadev Kudav Oct 2, 2026

पावसासाठी प्रार्थना करणाऱ्या गणू कसेकर यांचा येमेकोंडकरांकडून सत्कार

सिरसंगी प्रतिनिधी गेल्या दीड महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने यमेकोंड परिसरात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. पावसाअभावी शेतकरी चिंतेत…

ByByMahadev Kudav Oct 2, 2026

वाटंगी येथील पंढरीनाथ पतसंस्थेला १२ लाख ३७ हजारांचा नफा

चेअरमन शिवाजी नांदवडेकर यांची माहिती सिरसंगी प्रतिनिधी वाटंगी येथील श्री पंढरीनाथ सहकारी पतसंस्थेची ३२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा…

ByByMahadev Kudav Sep 27, 2026

सिरसंगी, किणे, वाटंगी, कोळींद्रे परिसरात गणेशाचे उत्साहात स्वागत

सिरसंगी प्रतिनिधी :गणरायाच्या आगमनाने आजरा तालुक्यातील सिरसंगी, किणे, वाटंगी, कोळींद्रे परिसरात भक्तिमय आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.…

ByByMahadev Kudav Sep 14, 2026

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top