आपली बातमी प्रसिद्ध करायची आहे?

स्थानिक बातमी किंवा जाहिरात हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा — जलद आणि विश्वासार्ह.

📲 आत्ताच संपर्क करा
mahalaxmi kolindre

कोळिंद्रे पोश्रातवाडी यात्रा 5 व 6 मे रोजी

तब्बल 21 वर्षांनंतर होणार महालक्ष्मी यात्रा

सिरसंगी प्रतिनिधी
कोळिंद्रे पोश्रातवाडी श्री महालक्ष्मी यात्रा तब्बल 21 वर्षांनी म्हणजेच 5 ते 8 मे 2026 अखेर यात्रा मोठ्या भक्ती भावाने संपन्न होत आहे. सुमारे शेकडो वर्षापासून पूर्वजांपासून यात्रा साजरी होत आहे . मंगळवार दि. 7 ते 26 एप्रिल पर्यंत सर्व धार्मिक विधी पार पडले असून मंगळवार दिनांक 28 एप्रिल रोजी इरडे पडून मुख्य यात्रा उत्साहाला सुरुवात झाली आहे. देवीला मंगळवारी पुरण पोळीचा नैवेद्य दाखवणार आहेत. यावेळी देवीला साडी चोळीचा आहेर करण्यात येतो. मंगळवार दिनांक 5 मे रोजी रात्री 10 वाजले पासून लक्ष्मी खेळवणेचा कार्यक्रम संपन्न होणार आहे.यावेळी पी डबाक या वाद्याचे आयोजन करण्यात आले आहे.बुधवारी 6 मे रोजी पहाटे पाच वाजता श्री लक्ष्मी देवी गदगिला बसणार आहे.तर साडे पाच वाजता बळ फिरविले जाणार आहे. तर पहाटे साडे सहा वाजता बळ पाडण्याचा कार्यक्रम होणार आहे. रात्री नऊ वाजता खरीस शिंपण्याचा कार्यक्रम होणार आहे. बुधवार दुपारपासून पाहुण्यासाठी मांसहार जेवनाचे नियोजन केले आहे. गुरुवार दिनांक 7 मे रोजी देवीची ओटी भरून मागणी चे दंडवत घातले जाणार आहे.शुक्रवार दिनांक 8 मे रोजी ओटी भरणे चा कार्यक्रम होणार आहे.तर सायंकाळी चार नंतर लक्ष्मी भंडारणे व लक्ष्मी पाऊण देण्याचा कार्यक्रम होणार आहे.यात्रा काळात विविध सांस्कृतिक कार्यक्रम व विविध स्पर्धा आयोजित केल्या आहेत.तर कोल्हापूर येथील. ऑर्केस्ट्रा चे आयोजन करण्यात आले असून बाहेरून गावात येणाऱ्या प्रत्येक रस्त्यावर वाहनांसाठी पार्किंग ची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती महालक्ष्मी यात्रा कमिटीचे प्रकाश पाटील , सुरेश सावंत, नामदेव पाटील , सुभाष सावंत, गणपती पाटील , रामचंद्र पाटील , आनंदा पाटील , रमेश बुगडे, संतोष पाटील , सुनील देसाई यांनी माहिती दिली

संबंधित बातम्या

मोरेवाडीत हत्तीचा धुमाकूळ; सिरसंगी परिसरात बिबट्याची दहशत शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

सिरसंगी प्रतिनिधी : आजरा तालुक्यातील मोरेवडी धनगरवाडा येथे हत्तीने धुमाकूळ घातला असून, भातपीक उसपीक व केळी बागेची नासधूस…

ByByMahadev Kudav Oct 10, 2026

केंद्रप्रमुख आनंदराव भादवणकर यांचा सेवापूर्ती समारंभ उत्साहात 

सिरसंगी प्रतिनिधी : गवसे-उमगाव, ता. चंदगड येथील केंद्रप्रमुख श्री. आनंदराव शंकर भादवणकर यांच्या ३८ वर्षे ६ महिने ९…

ByByMahadev Kudav Oct 9, 2026

आदर्श हायस्कूल सिरसंगीमध्ये महात्मा गांधी , लाल बहादूर शास्त्री जयंती उत्साहात

सिरसंगी प्रतिनिधी आदर्श हायस्कूल सिरसंगी प्रशालेमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती…

ByByMahadev Kudav Oct 2, 2026

पावसासाठी प्रार्थना करणाऱ्या गणू कसेकर यांचा येमेकोंडकरांकडून सत्कार

सिरसंगी प्रतिनिधी गेल्या दीड महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने यमेकोंड परिसरात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. पावसाअभावी शेतकरी चिंतेत…

ByByMahadev Kudav Oct 2, 2026

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top