आपली बातमी प्रसिद्ध करायची आहे?

स्थानिक बातमी किंवा जाहिरात हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा — जलद आणि विश्वासार्ह.

📲 आत्ताच संपर्क करा
  • Home
  • ब्लॉग
  • आजरा साखर कारखान्यामार्फत सिरसंगी व किणे येथे साखर वाटप
sirsangi

आजरा साखर कारखान्यामार्फत सिरसंगी व किणे येथे साखर वाटप

सिरसंगी प्रतिनिधी

सिरसंगी व किणे येथे वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्याच्या मार्फत सभासदांना व ऊस उत्पादकांना देण्यात येणाऱ्या सवलतीच्या दरामध्ये साखर वाटप करण्यात आले . सिरसंगी येथे साखर वाटप उद्घाटन माजी व्हा . चेअरमन मा. श्री. सुभाष देसाई साहेब यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी देसाई यांनी पंधरा हजार पूर्ण असलेल्या सभासदाना 50 किलो , दहा हजार पूर्ण असलेल्या संभासदाना 25 किलो व सात हजार पूर्ण असलेल्या संभासदाना 15 किलो साखर वितरित करणार असल्याचे सांगितले . त्याचबरोबर टनेजची साखर टना मागे अर्धा किलो साखर वाटप करणार असून 25 रु किलो दराने साखर वाटप सुरू असून सभासदानी जवळील तालुका संघाच्या शाखेमधून साखर घ्यावी असे आवाहन करण्यात आले . व यावेळी सुभाष चौगले , प्रताप देसाई ,विजय देसाई , अनिल मुळीक , विष्णु देसाई , संघ मॅनेजर राजेंद्र कोलेकर, बंडोपंत देसाई, मारुती देसाई संजय पाटील भिकाजी कांबळे यांच्यासह सभासद, ऊस उत्पादक सिरसंगी व कर्मचारी उपस्थित होते.

सिरसंगी ; साखर वाटप करताना माजी व्हा . चेअरमन मा. श्री. सुभाष देसाई, सुभाष चौगले , प्रताप देसाई ,विजय देसाई , अनिल मुळीक , भीकजी कांबळे , विष्णु देसाई , संघ मॅनेजर राजेंद्र कोलेकर

किणे येथे उपसरपंच विजय केसरकर यांच्या हस्ते साखर वाटप उद्घाटन करण्यात आले

वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्याच्या मार्फत सभासदांना व ऊस उत्पादकांना देण्यात येणाऱ्या सवलतीच्या दरामध्ये साखर वाटप चे किणे शाखेत उद्घाटन मा. श्री. विजय केसरकर साहेब यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी श्रीकांत बामणे , गोविंद वांजोळे , संजय पाटील यांच्यासह सभासद. ऊस उत्पादक संघ. मॅनेजर किणे व कर्मचारी उपस्थित होते.

kine विजय केसरकर श्रीकांत बामणे गोविंद वांजोळे व इतर

संबंधित बातम्या

आदर्श हायस्कूल सिरसंगीमध्ये महात्मा गांधी , लाल बहादूर शास्त्री जयंती उत्साहात

सिरसंगी प्रतिनिधी आदर्श हायस्कूल सिरसंगी प्रशालेमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती…

ByByMahadev Kudav Oct 2, 2026

पावसासाठी प्रार्थना करणाऱ्या गणू कसेकर यांचा येमेकोंडकरांकडून सत्कार

सिरसंगी प्रतिनिधी गेल्या दीड महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने यमेकोंड परिसरात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. पावसाअभावी शेतकरी चिंतेत…

ByByMahadev Kudav Oct 2, 2026

वाटंगी येथील पंढरीनाथ पतसंस्थेला १२ लाख ३७ हजारांचा नफा

चेअरमन शिवाजी नांदवडेकर यांची माहिती सिरसंगी प्रतिनिधी वाटंगी येथील श्री पंढरीनाथ सहकारी पतसंस्थेची ३२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा…

ByByMahadev Kudav Sep 27, 2026

सिरसंगी, किणे, वाटंगी, कोळींद्रे परिसरात गणेशाचे उत्साहात स्वागत

सिरसंगी प्रतिनिधी :गणरायाच्या आगमनाने आजरा तालुक्यातील सिरसंगी, किणे, वाटंगी, कोळींद्रे परिसरात भक्तिमय आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.…

ByByMahadev Kudav Sep 14, 2026

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top