आपली बातमी प्रसिद्ध करायची आहे?

स्थानिक बातमी किंवा जाहिरात हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा — जलद आणि विश्वासार्ह.

📲 आत्ताच संपर्क करा
निवेदन

पाच महिन्यांपासून रजेवर असणाऱ्या शिक्षिकेच्या बदलीची मागणी

सिरसंगी प्राथमिक शाळा व्यवस्थापन समितीने दिली तक्रार

किणे वार्ताहर
आजरा तालुक्यातील सिरसंगी केंद्रशाळेत रुजू झालेपासून एकही दिवस अध्यापन न करता गेले पाच महिने तब्येतीच्या कारणास्तव रजेवर असणाऱ्या शिक्षिकेच्या बदलीची मागणी सिरसंगी प्राथमिक शाळा व्यवस्थापन समितीने निवेदनाद्वारे केली आहे. सदर निवेदन गट शिक्षणाधिकारी बसवराज गुरव यांचेकडे सादर केले आहे.
सदर निवेदनात असे म्हटले आहे की 21/11/2025 रोजी सदर शिक्षिका आँनलाईन बदली द्वारे सिरसंगी केंद्र शाळेमध्ये हजर झाल्या होत्या. पण त्यांनी गेल्या पाच महिन्यांपासून एकही दिवस शालेय वर्गावर अध्यापन केले नाही. त्यामुळे मूलांचे शैक्षणिक नुकसान झाले असून त्यांची इतरत्र बदली करावी व मुलांचे शैक्षणिक नुकसान थांबवावे अशी मागणी करून त्यांची बदली न झाल्यास पंचायतीसमोर उपोषणचा इशारा शालेय समितीने निवेदनाद्वारे दिला आहे. यावेळी गटशिक्षणाधिकारी गुरव यांनी आपल्यामर्फत योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले .
गटशिक्षणाधिकारी बसवराज गुरव यांना शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष कांबळे, संतोष चौगले, महादेव कुडव , पालक सागर कुंभार, सागर रवि़द्र कुंभार प्रथमेश कुंभार यांनी निवेदन दिले.

संबंधित बातम्या

रवळनाथ विकास सेवा संस्थेला 2 लाख 45 हजार रुपयांचा नफा

चेअरमन मधुकर येलगार यांची माहिती; वार्षिक सर्व साधारण सभा सिरसंगी प्रतिनिधी सिरसंगी येथील श्री रवळनाथ विकास सेवा संस्थेला…

ByByMahadev Kudav Aug 28, 2026

शिरसंगी आदर्श हायस्कूलमध्ये पार पडला विध्यार्थी गुणगौरव सोहळा

सिरसंगी प्रतिनिधी आदर्श हायस्कूल शिरसंगी प्रशालेमध्ये एसएससी मार्च 2026 परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा पार…

ByByMahadev Kudav Aug 22, 2026

एकादशीनिमित्त गेली 36 वर्ष चहापाणी देणारे येमेकोंडचे ह.भ .प. गणू महाराज

सिरसंगी प्रतिनिधी गेली 36 वर्षे एकादशीनिमित्त गावातील जमलेल्या गावकऱ्याना चहापाणी देऊन तोंड गोड करणारे गणू भीमा कसेकर हे…

ByByMahadev Kudav Jul 25, 2026

प्राथमिक शाळा म्हणजे संस्कार केंद्र: अंजनाताई रेडेकर

सिरसंगी प्रतिनिधी आपल्या गावातील प्राथमिक शाळा या संस्कार केंद्रे असून त्यांचे जतन व संवर्धन आपण सर्वांनीच केले पाहिजे…

ByByMahadev Kudav Jul 21, 2026

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top