आपली बातमी प्रसिद्ध करायची आहे?

स्थानिक बातमी किंवा जाहिरात हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा — जलद आणि विश्वासार्ह.

📲 आत्ताच संपर्क करा
  • Home
  • ब्लॉग
  • येमेकोंड ग्रामस्थांनी चालकासह ब्लास्टिंग गाडी आडवली
Image

येमेकोंड ग्रामस्थांनी चालकासह ब्लास्टिंग गाडी आडवली

पृथ्वी स्टोन क्रशरवरील ब्लास्टिंगमुळे घराना हादरे , भितिंना भेगा

पोलिसांच्या मध्यस्थीनंतर चालकासह गाडी सोडली

सिरसंगी प्रतिनिधी

सोमवारी सायंकाळी सात वाजता येमेकोड गावानजीक असलेल्या पृथ्वी स्टोन क्रशरवर ब्लास्टिंग केल्यानंतर मोठा स्फोट होऊन येथील घरांना हादरे बसले. यामध्ये नागरिकांना भूकंप झाल्याचा भास झाला लागलीच गावातील सर्व ग्रामस्थ लहान थोर मंडळी तरुण मंडळी एकत्र जमून ब्लास्टिंग सुरू असलेल्या स्टोन क्रेशर वरील गाडी अडवली व गाडी मालक झुबेर चाँद व चालकासह गावात घेऊन आले. क्रेशर मालक आल्याशिवाय गाडी सोडणार नाही असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला होता. यावेळी ग्रामस्थांनी सध्या सुरू असलेल्या ब्लास्टिंग मुळे सार्वजनिक विहिरीला तडे गेले असल्याचे सांगितले . विहिरीचे सर्व पाणी पाझरून सुमारे वीस एकर जमीन क्षारपड झाल्याचे सांगितले. काही ग्रामस्थांनी घराच्या भिंतींना तडे गेल्याचे सांगितले. क्रेशर मुळे सगळीकडे धुळीचे साम्राज्य पसरले असून हवा प्रदूषित झाल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली. दोन महिन्यापूर्वी तहसीलदार प्रांत अधिकारी यांना निवेदन देऊनही या क्रशरवर ब्लास्टिंग सुरूच असून त्यातच सुमारे वीस ते तीस फूट ब्लास्टिंग घातल्यामुळे शेत शिवारात दगडांचे खच पाहायला मिळत असल्याचे आरोप ग्रामस्थांनी केले. यावेळी महिलाही आक्रमक झालेल्या पाहायला मिळाल्या. कोणत्याही परिस्थित क्रशर बंद करा अशी सरपंच संदीप चौगले यांचेकडे मागणी केली . यावेळी सरपंच संदीप चौगुले यांनी ग्रामस्थांशी चर्चा करताना सांगितले की उद्या नऊ वाजता तहसीलदार कार्यालयावर मोठ्या संख्येने मोर्चा घेऊन जाऊ व क्रेशर मालक यांना त्याठिकाणी बोलवून चालू असलेले सर्व क्रशर बंद करण्यासाठी प्रयत्न करू असे आवाहन केले.
यावेळी आजरा पोलीस ठाण्यातून हवालदार वैभव गवळी यांनी मध्यस्थी करून अडवून ठेवलेली ब्लास्टिंग ची गाडी सोडण्यासाठी आवाहन केले. यावेळी ग्रामस्थानी पुन्हा येमेकोंड परिसरात ब्लास्टिंग गाडी दिसली तर फोडून टाकण्यात येईल असा सज्जड दम दिला .

येमेकोंड येथील जमलेले ग्रामस्थ

ब्लास्टिंगमुळे घराना भेगा

संबंधित बातम्या

मोरेवाडीत हत्तीचा धुमाकूळ; सिरसंगी परिसरात बिबट्याची दहशत शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

सिरसंगी प्रतिनिधी : आजरा तालुक्यातील मोरेवडी धनगरवाडा येथे हत्तीने धुमाकूळ घातला असून, भातपीक उसपीक व केळी बागेची नासधूस…

ByByMahadev Kudav Oct 10, 2026

केंद्रप्रमुख आनंदराव भादवणकर यांचा सेवापूर्ती समारंभ उत्साहात 

सिरसंगी प्रतिनिधी : गवसे-उमगाव, ता. चंदगड येथील केंद्रप्रमुख श्री. आनंदराव शंकर भादवणकर यांच्या ३८ वर्षे ६ महिने ९…

ByByMahadev Kudav Oct 9, 2026

आदर्श हायस्कूल सिरसंगीमध्ये महात्मा गांधी , लाल बहादूर शास्त्री जयंती उत्साहात

सिरसंगी प्रतिनिधी आदर्श हायस्कूल सिरसंगी प्रशालेमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती…

ByByMahadev Kudav Oct 2, 2026

पावसासाठी प्रार्थना करणाऱ्या गणू कसेकर यांचा येमेकोंडकरांकडून सत्कार

सिरसंगी प्रतिनिधी गेल्या दीड महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने यमेकोंड परिसरात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. पावसाअभावी शेतकरी चिंतेत…

ByByMahadev Kudav Oct 2, 2026

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top