आपली बातमी प्रसिद्ध करायची आहे?

स्थानिक बातमी किंवा जाहिरात हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा — जलद आणि विश्वासार्ह.

📲 आत्ताच संपर्क करा
Image

हत्तीने स्कूलबस केली पलटी ..ओमनीचे केले नुकसान

सिरसंगी गावात धुडगूस

सिरसंगी प्रतिनिधी


शेत शिवारात धुमाकूळ घालणाऱ्या हत्तीने शनिवारी पहाटे साडेतीन वाजता सिरसंगी गावात धुडगूस घातला. रस्त्याकडेला उभी केलेली ए डी शिंदे इंजिनिअरींग काॅलेजची बसची मोडतोड करून पलटी केली त्याचबरोबर काजू फैकटरी समोर उभी केलेली ओमनी गाडीची मोडतोड करून नुकसान केले . शिवारात धुमाकूळ घालणाऱ्या हत्तीने गावाकडे मोर्चा वळवल्यामुळे नागरिकांतून भितीचे वातावरण पसरले आहे.
ए डी शिंदे इंजिनिअरींग काॅलेजची बसचालक दयानंद बुडके यांनी सदर गाडी बाबुराव बुडके यांच्या घरासमोर उभी केली होती. सदर गाडी वर हत्तीने हल्ला करून मोडतोड केली त्यानंतर हत्तीने काजू उद्योजक अनिल निकम यांच्या काजू फैक्टरीसमोर उभी केलेली ओमनी कारचेही नुकसान केले. नुकसानग्रस्त वाहनांचे वनविभागाकडून वनपाल शिंदे, वनरक्षक तानाजी कवळिकट्टकर, तानाजी खांडेकर यांनी पंचनामे केले. हत्ती आता गावात येऊ लागल्यामुळे नागरीकाना मुठीत जिव घेऊन राहावे लगत आहे . हत्तीने आतापर्यंत तीन मोटर् सायकल एक बोलेरो पीक अप , एक मारुती कार एक ओमणी कार , एक कॉलेज बस अशी एकूण सात वाहनाचे सुमारे 15 लाखांचे नुकसान केले आहे. दररोज शेतीचे होणारे नुकसान वेगळे हत्तीच्या पाठोपाठ 3 0-40 गव्यांचा कळप शेत शिवार फस्त करत असून यामुळे शेती करायची कशी असा प्रश्न सिरसंगी ग्रामस्थाना भेडसावत आहे .

संबंधित बातम्या

मोरेवाडीत हत्तीचा धुमाकूळ; सिरसंगी परिसरात बिबट्याची दहशत शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

सिरसंगी प्रतिनिधी : आजरा तालुक्यातील मोरेवडी धनगरवाडा येथे हत्तीने धुमाकूळ घातला असून, भातपीक उसपीक व केळी बागेची नासधूस…

ByByMahadev Kudav Oct 10, 2026

केंद्रप्रमुख आनंदराव भादवणकर यांचा सेवापूर्ती समारंभ उत्साहात 

सिरसंगी प्रतिनिधी : गवसे-उमगाव, ता. चंदगड येथील केंद्रप्रमुख श्री. आनंदराव शंकर भादवणकर यांच्या ३८ वर्षे ६ महिने ९…

ByByMahadev Kudav Oct 9, 2026

सिरसंगी, किणे, वाटंगी, कोळींद्रे परिसरात गणेशाचे उत्साहात स्वागत

सिरसंगी प्रतिनिधी :गणरायाच्या आगमनाने आजरा तालुक्यातील सिरसंगी, किणे, वाटंगी, कोळींद्रे परिसरात भक्तिमय आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.…

ByByMahadev Kudav Sep 14, 2026

सिरसंगीतील सुतार कुटुंबाची चौथी पिढी गणेशमूर्ती कलेचा वारसा जपत आहे

सिरसंगी प्रतिनिधी सिरसंगी (ता. आजरा) येथील सुतार कुटुंबाची गणेशमूर्ती बनविण्याची परंपरा चौथ्या पिढीतही सुरू असून, दशरथ सुतार व…

ByByMahadev Kudav Sep 10, 2026

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top