आपली बातमी प्रसिद्ध करायची आहे?

स्थानिक बातमी किंवा जाहिरात हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा — जलद आणि विश्वासार्ह.

📲 आत्ताच संपर्क करा
  • Home
  • ब्लॉग
  • भादवण मध्ये नूतन जि. प. व पं ,स . सदस्यांचा सत्कार सोहळा
Image

भादवण मध्ये नूतन जि. प. व पं ,स . सदस्यांचा सत्कार सोहळा

मुख्यमंत्री बळीराजा पाणंद योजना व सूर्य घर योजना राबवणार : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

सुभाष पोवार / भादवण प्रतिनिधी

भादवण ता. (आजरा ) येथील सार्वजनिक पटांगणामध्ये घेण्यात आलेल्या विराट सभेमध्ये वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ अध्यक्षस्थानी होते. मा हसन मुश्रीफ यांच्या हस्ते जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचा सत्कार करण्यात आला.
भादवण मध्ये घेण्यात आलेल्या जिल्हा परिषदेचे सदस्य व पंचायत समितीचे सदस्य यांचा विविध मान्यवरांच्या उपस्थित व 21 गावातून आलेल्या कार्यकर्त्यांच्या उपस्थित हा विजयी सोहळा मोठ्या आनंदात पार पाडण्यात आला . यावेळी केडीसी बँकेचे संचालक व पेरणोली जिल्हा परिषदेचे नूतन सदस्य मा श्री सुधीर देसाई. उत्तुर जिल्हा परिषदेचे सदस्य मा श्री शिरीष देसाई याचबरोबर भादवण गणातून निवडून आलेल्या पंचायत समितीच्या सभापती जयश्री गाडे, पंचायत समिती उपसभापती यशोदाताई पोवार,उत्तूर पंचायत समिती मधून विकास चोते आणि आजरा शेतकरी सहकारी कारखाना उपाध्यक्षपदी निवड झालेले अनिल फडके यांचा सत्कार करण्यात आला . यावेळी मा हसन मुश्रीफ यांनी मतदार बंधू चे आभार मानले नूतन सदस्यानी विकासासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन केले कागल मतदार संघाला नवीन 14 गावे जोडलेले आहेत त्यांची धुरा जिल्हा परिषद सदस्य शिरीष भाऊ देसाई यांच्यावर सोपवली आहे, दर शुक्रवारी प्रत्येक गावातील प्राथमिक शाळेचे स्वरूप, पिण्याचे पाण्याचे प्रश्न आरोग्य विषयक प्रश्न, याविषयी सभापती व उपसभापती आपल्या दारी ही संकल्पना शासकीय कर्मचाऱ्यांच्या मार्फत अमलात आणण्याचे आवाहन मा मुश्रीफ यांनी केले. यावेळी मुश्रीफ यांनी आपल्या कामाचा आढावा घेतला .तसेच मुख्यमंत्री बळीराजा- पानंद रस्ते तयार करण्यासाठी 25 कोटी रुपये देणार असल्याचे सांगितले. सूर्य घर योजनेसाठी केडीसी बँकेकडून कर्ज उपलब्ध करून देणार असल्याची माहिती दिली व यासाठी भागातील सर्वानी याचा लाभ घेण्याचे आवाहनही मा मुश्रीफ यांनी केले
यावेळी सभापती सौ जयश्री गाडी यांनी आपल्या मनोगतात विजयाचे श्रेय मतदार बंधू-भगिनींना दिले, मा हसन मुश्रीफ साहेब यांच्या माध्यमातून व सहकाऱ्यांच्या मार्फत आजरा पंचायत समिती जिल्ह्यात एक नंबरला आणू असे आश्वासन दिले . उपसभापती यशोदा युवराज पवार यांनी आपण कामामध्ये सातत्य ठेवून तालुक्याचा विकास करणार असल्याचे सांगितले. आजरा कारखान्याचे व्हा . चेअरमन अनिल फडके , काशिनाथ तेली यांनी मनोगत व्यक्त केली . यावेळी स्वागत भादवण गावचे माजी उपसरपंच संजय गाडे यांनी केले.
यावेळी प्रमुख उपस्थित – सतीश पाटील, आजरा कारखान्याचे चेअरमन मुकुंद दादा देसाई, वसंतराव धुरे , एमके देसाई, मारुती घोरपडे, दीपक देसाई, राजू मुरकुटे, सुधीर सावंत, दत्ता जाधव, संजय येजरे, इंद्रजीत गाडे, आनंदा कुंभार, इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री गणपतराव सागले यांनी केले, प्रस्तावना श्री बीटी जाधव यांनी केले, स्वागत श्री विष्णू मुळीक यांनी केले आभार श्री सदाशिव पाटील यांनी केले. यावेळी या कार्यक्रमाला विविध संस्थेचे पदाधिकारी, विविध मंडळे, व ग्रामस्थ उपस्थित होते.

संबंधित बातम्या

सिरसंगीचे विजय वांजोळे यांची मुंबई लोहमार्ग पोलिसपदी निवड

सिरसंगी प्रतिनिधी आजरा तालुक्यातील सिरसंगी गावचे सुपुत्र विजय विठ्ठल वांजोळे यांची मुंबई लोहमार्ग पोलिसपदी निवड झाली आहे .…

ByByMahadev Kudav May 29, 2026

हंदेवाडीकरांनी दिले जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

आजरा पंचायत समिति प्रशासनाकडून तक्रारीकडे दुर्लक्ष – ग्रामस्थांचा आरोप सिरसंगी प्रतिनिधी हंदेवाडी तालुका आजरा येथील विठ्ठल रुक्मिणी वसाहतीतील…

ByByMahadev Kudav May 29, 2026

चंदगड – मुंबई एसटी सेवेमुळे अनेक वर्षांची प्रतीक्षा संपली: प्रकाश पाटकर

चंदगड प्रतिनिधी पारगड–चंदगड–मुंबई व चंदगड–कल्याण या एस.टी. बस सेवा पुन्हा सुरू झाली अन चंदगड तालुक्यातील नागरिकांची अनेक वर्षापासूनची…

ByByMahadev Kudav May 29, 2026

हंदेवाडी येथील गावांतर्गत रस्ते पावसाळ्यापूर्वी पूर्ण करा

सिरसंगी प्रतिनिधी हंदेवाडी तालुका आजरा येथील विठ्ठल रुक्मिणी वसाहतीतील महात्मा गांधी रोजगार हमी योजना मधून मंजूर झालेल्या रस्त्यांची…

ByByMahadev Kudav May 23, 2026
5 Comments Text
  • porntude says:
    Your comment is awaiting moderation. This is a preview; your comment will be visible after it has been approved.
    Very good i like it
  • porntude says:
    Your comment is awaiting moderation. This is a preview; your comment will be visible after it has been approved.
    wish you all the best
  • 333985 says:
    Your comment is awaiting moderation. This is a preview; your comment will be visible after it has been approved.
    Mass comment blasting: $10 for 100k comments. All from unique blog domains, zero duplicates. I will provide a full report and guarantee Ahrefs picks them up. Email mailto:helloboy1979@gmail.com for payment info.If you received this, you know Ive got the skills.
  • 333985 says:
    Your comment is awaiting moderation. This is a preview; your comment will be visible after it has been approved.
    wish you best and best
  • 啪啪导航 says:
    Your comment is awaiting moderation. This is a preview; your comment will be visible after it has been approved.
    色即是空,空即是色
  • Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    Scroll to Top