आपली बातमी प्रसिद्ध करायची आहे?

स्थानिक बातमी किंवा जाहिरात हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा — जलद आणि विश्वासार्ह.

📲 आत्ताच संपर्क करा
  • Home
  • दैनिक बातम्या
  • सिरसंगी आदर्श हायस्कूलमध्ये दहावीच्या मुलांना परीक्षेसाठी शुभेच्छा
highschool shirsangi

सिरसंगी आदर्श हायस्कूलमध्ये दहावीच्या मुलांना परीक्षेसाठी शुभेच्छा

सिरसंगी प्रतिनिधी

सिरसंगी येथील आदर्श हायस्कूल मधील दहावीच्या मुलांना मार्च 2026 च्या परीक्षेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आजरा महाल शिक्षण मंडळाचे ज्येष्ठ संचालक श्री पांडुरंग जाधव होते तर प्रमुख पाहुणे म्हणून आजरा महाल शिक्षण मंडळाचे संचालक माननीय श्री सुधीर जाधव उपस्थित होते. त्यावेळी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक श्री पाटील सर यांनी केले.

यावेळी इयत्ता आठवी इयत्ता नववीतील विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी सौ पाटील मॅडम, श्री विठ्ठल चौगुले सर यांनी आपल्या मनोगतामध्ये विद्यार्थ्यांना परीक्षे संदर्भात सूचना दिल्या.

अध्यक्षीय मनोगतात श्री पांडुरंग पाटील यांनी मुलांना परीक्षेच्या वेळी कोणती काळजी घ्यावी आरोग्य कसे सांभाळावे या संदर्भात बहुमोल मार्गदर्शन केले.
यावेळी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी शाळेकरिता अहुजा कंपनीचे स्पीकर सेट शाळेला भेट दिली.
या कार्यक्रमाचे प्रस्ताविक श्री मदन देसाई यांनी केले तर आभार श्री आनंदा प्रभू यांनी मांडले

संबंधित बातम्या

हंदेवाडीकरांनी दिले जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

आजरा पंचायत समिति प्रशासनाकडून तक्रारीकडे दुर्लक्ष – ग्रामस्थांचा आरोप सिरसंगी प्रतिनिधी हंदेवाडी तालुका आजरा येथील विठ्ठल रुक्मिणी वसाहतीतील…

ByByMahadev Kudav May 29, 2026

हंदेवाडी येथील गावांतर्गत रस्ते पावसाळ्यापूर्वी पूर्ण करा

सिरसंगी प्रतिनिधी हंदेवाडी तालुका आजरा येथील विठ्ठल रुक्मिणी वसाहतीतील महात्मा गांधी रोजगार हमी योजना मधून मंजूर झालेल्या रस्त्यांची…

ByByMahadev Kudav May 23, 2026

हंदेवाडीच्या दिनकर कांबळे यांचा आजरा पं. समिती मध्ये सत्कार

सिरसंगी प्रतिनिधी हंदेवाडी ता. आजरा येथील दिनकर महादेव कांबळे यांचा पंचायत समिती आजरा येथे सत्कार करण्यात आला. अध्यक्ष…

ByByMahadev Kudav May 18, 2026

किणे येथे संकल्प ग्रामविकास प्रतिष्ठानतर्फे विविध सामाजिक उपक्रम

सिरसंगी प्रतिनिधी संकल्प ग्रामविकास प्रतिष्ठान किणे यांचेतर्फे कामगार दिनाचे औचित्य साधून विद्यार्थी गुणगौरव सोहळा व रक्तदान शिबिर त्याचबरोबर…

ByByMahadev Kudav May 6, 2026

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top