आपली बातमी प्रसिद्ध करायची आहे?

स्थानिक बातमी किंवा जाहिरात हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा — जलद आणि विश्वासार्ह.

📲 आत्ताच संपर्क करा
  • Home
  • ब्लॉग
  • रवळनाथ विकास सेवा संस्थेला 2 लाख 45 हजार रुपयांचा नफा
Image

रवळनाथ विकास सेवा संस्थेला 2 लाख 45 हजार रुपयांचा नफा

चेअरमन मधुकर येलगार यांची माहिती; वार्षिक सर्व साधारण सभा

सिरसंगी प्रतिनिधी


सिरसंगी येथील श्री रवळनाथ विकास सेवा संस्थेला 2025-26 या चालू आर्थिक वर्षामध्ये 2 लाख 45 हजार रुपयांचा नफा झाल्याचे चेअरमन मधुकर येलगार यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत सांगितले . हनुमान दूध संस्थेच्या सभागृहामध्ये सदर विकास सेवा संस्थेची वार्षिक सभा पार पडली या सभेचे अध्यक्षस्थानी चेअरमन मधुकर येलगार होते. सुरुवातीला विकास सेवा संस्थेचे माजी चेअरमन मुकुंदराव देसाई यांच्या दुःखद निधनाबद्दल आजरा साखर कारखान्याचे माजी व्हा. चेअरमन श्री सुभाष देसाई यांनी श्रद्धांजलीचा ठराव मांडला त्यानंतर अहवाल वाचन सचिव सुभाष चौगुले यांनी केले. यावेळी विविध विषयावर चर्चा करण्यात आली, यावेळी महादेव देसाई व नीलेश सुतार यांनी वार्षिक अहवालाच्या प्रती ज्यादा काढून संभासदाना पोहच करण्याविषयची मागणी केली . तसेच नवीन सभासद नोंदणी करून संस्थेमध्ये वाढीव सभासद करून घेण्याविषयी सूचना केल्या त्याचबरोबर वार्षिक सर्वसाधारण सभा व मासिक सभाना सर्व संचालकांना उपस्थित राहण्याबाबत सूचना करण्याचा ठराव करण्यात आला , संस्थेची असलेल्या रिकाम्या जागी कंपाऊंड बांधण्या विषयाचा सूचना महादेव देसाई यांनी केली. यावेळी निलेश सुतार व प्रकाश कानडे, रमेश देसाई यांनी आजरा तालुका शेतकरी संघासाठी दिलेल्या गोडाऊनचे भाडे वाढवून घेण्यासंदर्भात मागणी केली यावेळी चेअरमन मधुकर येलगार यांनी सभासदांच्या प्रश्नांना उत्तर देताना सांगितले की आजरा तालुका संघाला दिलेल्या गोडाऊनचे भाडेवाढ करुन मिळण्यासाठी त्या संदर्भात आपण मागणी केल्याचे सांगीतले, त्याच बरोबर पावसाळा संपल्यानंतर रिकाम्या जागी कंपाऊंड बांधण्याचे काम सुरू करणार असल्याचे सांगितले. त्याचबरोबर दरवर्षीप्रमाणे यंदाही संभासदाना 5% लाभांश वाटप करणार असल्याचे सांगितले . दत्तात्रय येलगार , जयसिंग देसाई , केरबा कुंभार , पांडुरंग टकेकर यांनी तालुका संघाकडून होणारा रासायनिक खताचा पुरवठा हा फारच कमी असून उस उत्पादनात सिरसंगी गाव अग्रेसर असल्यामुळे यासंदर्भात तालुका शेतकरी संघाकडून रासायनिक खतांचा पुरवठा जास्तीत जास्त करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली. यावेळी व्हा चेअरमन धोंडीबा कुंभार , विजय देसाई , चंद्रकांत देसाई , अमृत देसाई , दत्तात्रय देसाई , प्रकाश बुडके , सुरेश येलगार , संतोष चौगले , वसंत सुतार , नारायण कांबळे , रामू कांबळे , वसंत दळवी , संजय कुंभार , प्रताप देसाई , बाबुराव सडेकर मधू कुंभार , पांडुरंग कानडे यांचेसह संस्थेचे सभासद उपस्थित होते . सुभाष देसाई यांनी आभार मानले .

अहवाल वाचन सचिव सुभाष चौगले करताना

संबंधित बातम्या

मोरेवाडीत हत्तीचा धुमाकूळ; सिरसंगी परिसरात बिबट्याची दहशत शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

सिरसंगी प्रतिनिधी : आजरा तालुक्यातील मोरेवडी धनगरवाडा येथे हत्तीने धुमाकूळ घातला असून, भातपीक उसपीक व केळी बागेची नासधूस…

ByByMahadev Kudav Oct 10, 2026

केंद्रप्रमुख आनंदराव भादवणकर यांचा सेवापूर्ती समारंभ उत्साहात 

सिरसंगी प्रतिनिधी : गवसे-उमगाव, ता. चंदगड येथील केंद्रप्रमुख श्री. आनंदराव शंकर भादवणकर यांच्या ३८ वर्षे ६ महिने ९…

ByByMahadev Kudav Oct 9, 2026

आदर्श हायस्कूल सिरसंगीमध्ये महात्मा गांधी , लाल बहादूर शास्त्री जयंती उत्साहात

सिरसंगी प्रतिनिधी आदर्श हायस्कूल सिरसंगी प्रशालेमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती…

ByByMahadev Kudav Oct 2, 2026

पावसासाठी प्रार्थना करणाऱ्या गणू कसेकर यांचा येमेकोंडकरांकडून सत्कार

सिरसंगी प्रतिनिधी गेल्या दीड महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने यमेकोंड परिसरात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. पावसाअभावी शेतकरी चिंतेत…

ByByMahadev Kudav Oct 2, 2026

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top