आपली बातमी प्रसिद्ध करायची आहे?

स्थानिक बातमी किंवा जाहिरात हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा — जलद आणि विश्वासार्ह.

📲 आत्ताच संपर्क करा
  • Home
  • ब्लॉग
  • शिरसंगी आदर्श हायस्कूलमध्ये पार पडला विध्यार्थी गुणगौरव सोहळा
Image

शिरसंगी आदर्श हायस्कूलमध्ये पार पडला विध्यार्थी गुणगौरव सोहळा

सिरसंगी प्रतिनिधी

आदर्श हायस्कूल शिरसंगी प्रशालेमध्ये एसएससी मार्च 2026 परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा पार पडला , या कार्यक्रमासाठी आजरा महाल शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष श्री के जी पटेकर, श्री सचिन शिंपी, श्री विलास पाटील, श्री श्री सुधीर जाधव, पांडुरंग जाधव, श्री अशोक पवार, सिरसंगी ग्रामपंचायत सरपंच श्री संदीप चौगुले, सुभाषराव देसाई आजरा कारखाना माजी व्हा. चेअरमन, श्री बुडके गुरुजी, प्रतापराव देसाई, दत्तात्रय एल्गार, मारुती दळवी, व्यंकटराव चे माजी प्राचार्य श्री नागुर्डेकर सर, प्राचार्य श्री संजय पाटील सर व दाते हजर होते. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. शाळेचे मुख्याध्यापक श्री मदन देसाई यांनी प्रास्ताविक केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री विठ्ठल चौगुले व श्री आनंदा प्रभू यांनी केले. श्री पटेकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी अपार मेहनत करून हे यश संपादन केले आहे, शाळेतील सर्वच शिक्षक निरपेक्ष भावनेने विद्यार्थ्यांच्या हिताकरिता आपला अधिकचा वेळ खर्च करून मुलांना मार्गदर्शन करतात त्यामुळेच हे सर्व शक्य होते असे सर्व शिक्षकांप्रती गौरोद्गार काढले.
यावेळी स्कॉलरशिप परीक्षा व एन एम एम एस राष्ट्रीय शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थिनी कुमारी प्रियंका सुभाष चौगुले हिचा देखील सत्कार करण्यात आला.
शाळेतील शिक्षक श्री प्रभू सर श्री चौगुले सर सौ चव्हाण मॅडम श्रुती वांजोळे मॅडमश्री दिलीप देसाई सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता मेहनत घेतली.
कार्यक्रमाचे आभार सौ मेघा विवेक चव्हाण यांनी मांडले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली

केंद्रात दुसरी व हायस्कूल मध्ये प्रथम क्रमांक मिळवलेली धनश्री राजेंद्र मयेकर हिचा सत्कार करताना मान्यवर .
सरपंच संदीप चौगले आजरा महाल शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष मा पटेकर यांचे स्वागत करताना
दीपप्रज्वलन करताना माजी उपसरपंच दत्तात्रय येलगार

संबंधित बातम्या

मोरेवाडीत हत्तीचा धुमाकूळ; सिरसंगी परिसरात बिबट्याची दहशत शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

सिरसंगी प्रतिनिधी : आजरा तालुक्यातील मोरेवडी धनगरवाडा येथे हत्तीने धुमाकूळ घातला असून, भातपीक उसपीक व केळी बागेची नासधूस…

ByByMahadev Kudav Oct 10, 2026

केंद्रप्रमुख आनंदराव भादवणकर यांचा सेवापूर्ती समारंभ उत्साहात 

सिरसंगी प्रतिनिधी : गवसे-उमगाव, ता. चंदगड येथील केंद्रप्रमुख श्री. आनंदराव शंकर भादवणकर यांच्या ३८ वर्षे ६ महिने ९…

ByByMahadev Kudav Oct 9, 2026

आदर्श हायस्कूल सिरसंगीमध्ये महात्मा गांधी , लाल बहादूर शास्त्री जयंती उत्साहात

सिरसंगी प्रतिनिधी आदर्श हायस्कूल सिरसंगी प्रशालेमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती…

ByByMahadev Kudav Oct 2, 2026

पावसासाठी प्रार्थना करणाऱ्या गणू कसेकर यांचा येमेकोंडकरांकडून सत्कार

सिरसंगी प्रतिनिधी गेल्या दीड महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने यमेकोंड परिसरात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. पावसाअभावी शेतकरी चिंतेत…

ByByMahadev Kudav Oct 2, 2026

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top