मडिलगे हायस्कूल प्रथम क्रमांक
आजरा हायस्कूल द्वितीय
पीएम श्री उर्दू प्राथमिक वि.मं . तृतीय क्रमांक
सिरसंगी प्रतिनिधी
श्रीमंत गंगामाई वाचनालय आजरा यांच्यावतीने घेण्यात आलेल्या शालेय समूहगीत गायन स्पर्धेत वाटंगी हायस्कूलने उल्लेखनीय कामगिरी करत उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले .
यासाठी संस्थेचे अध्यक्ष माननीय अल्बर्ट डिसोझा साहेब यांची प्रेरणा तसेच मुख्याध्यापक श्री अनिल देसाई सर यांचे मार्गदर्शन लाभले.
हे यश प्राप्त करण्यासाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ.माने मॅडम, हार्मोनियम वादक विश्वास कांबळे, ढोलकी वादक कुमार.आदीप देसाई सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचं सहकार्य लाभले.














