आपली बातमी प्रसिद्ध करायची आहे?

स्थानिक बातमी किंवा जाहिरात हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा — जलद आणि विश्वासार्ह.

📲 आत्ताच संपर्क करा
  • Home
  • ब्लॉग
  • सिरसंगी केंद्र शाळेच्या विध्यार्थ्यानी साकारले अप्रतिम “मनोरे’
Image

सिरसंगी केंद्र शाळेच्या विध्यार्थ्यानी साकारले अप्रतिम “मनोरे’

सिरसंगी प्रतिनिधी

80 व्या भारतीय स्वातंत्र दिनानिमित्त सिरसंगी केंद्र शाळेच्या विध्यार्थ्यानी ग्रामपंचायत कार्यालयासमोर अप्रतिम “मनोरे’ सादर करत उत्तम कौशल्याची चुणूक दाखवली. यामुळे उपस्थित ग्रामस्थानी विध्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक संतराम केसरकर व उत्तम कोकितकर यांचे कौतुक केले. केंद्र शाळेमध्ये शाळा कमिटी अध्यक्ष संतोष कांबळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले . तर आदर्श हायस्कूल व ग्रामपंचायत कार्यालयामध्ये प्रशासक संदीप चौगले यांचेहस्ते ध्वजारोहण करण्यात आले . यावेळी मुख्याद्यापक मदन देसाई यांचेहस्ते अग्निवीर ओमकार गणपती बुडके , वैभव संजय कुंभार यांचा सत्कार करण्यात आला .
यावेळी झालेल्या कार्यक्रमात केंद्र शाळेच्या विध्यार्थ्यानी अप्रतिम मानवी मनोरे सादर करत उत्कृष्ट कवायतीचे दर्शन घडवले, त्यामध्ये भारतमातेचा जयघोष यामुळे वातावरण अगदी मंगलमय बनले होते , आदर्श हायस्कूलच्या विध्यार्थिनिनी देशभक्ति आधारित गाण्यावर अप्रतिम समूह नृत्य करून कार्यक्रमाची रंगत वाढवली. अंगणवाडीतील चिमूकल्यानी केलेले विविध पेहराव, आदर्श हायस्कूलच्या विध्यार्थिनिनी प्रत्येक राज्यातील केलेले विशिष्ट पेहराव कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले . त्यानंतर विध्यार्थ्याची मराठीबरोबर इंग्लिश हिन्दी भाषेतून 80व्या भारतीय स्वातंत्र दिनानिमित्त भाषणं झाली , यावेळी गेली 20 वर्षे आखाती देशात नोकरीनिमित्त असणारे दीपक मधुकर देसाई यांनी सर्व विध्यार्थ्याना आपले अनुभव कथन केले , आपल्या मनोगतात त्यांनी सद्या स्पर्धेचे युग असून तुमच्या पुस्तकी हुशारीपेक्षा तुम्ही टॅलेंट किती आहे हे पाहिले जात असल्याचे त्यांनी नमूद केले . यावेळी हनुमान दूध संस्था व रवळनाथ विकास सेवा संस्था यांचेकडून पहिली ते दहावीतिल यशस्वी विध्यार्थ्याना वह्या वाटप करण्यात आल्या . संवेदना फाऊंडेशनतर्फे गरीब व अनाथ आशा 3 विद्यार्थ्याना संपूर्ण वर्षासाठीचे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले , यावेळी साखर कारखाना संचालक सुभाष देसाई , शेतकरी संघाचे संचालक मधुकर येलगार संतोष चौगले सि आर देसाई , संतोष कांबळे यांनी मार्गदर्शनपर मनोगते व्यक्त केली, यावेळी सर्व ग्रामपंचायत सदस्य अंगणवाडी सेविका ,मदतनीस आशा सेविका , आरोग्य विभागाचे कर्मचारी प्राथमिक व माध्यमिक शाळेतिल मुख्याद्यापक व स्टाफ यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते .



वैभव कुंभार यांचा सत्कार करताना आदर्श हायस्कूलचे मुख्याद्यापक एम एम देसाई सर
ओमकार बुडके यांचा सत्कार करताना आदर्श हायस्कूलचे मुख्याद्यापक एम एम देसाई सर
हनुमान दूध संस्थेमार्फत मुख्याद्यापक शिवाजी बोलके यांचेकडे शैक्षणिक साहित्य देताना सुभाष देसाई .

संबंधित बातम्या

मोरेवाडीत हत्तीचा धुमाकूळ; सिरसंगी परिसरात बिबट्याची दहशत शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

सिरसंगी प्रतिनिधी : आजरा तालुक्यातील मोरेवडी धनगरवाडा येथे हत्तीने धुमाकूळ घातला असून, भातपीक उसपीक व केळी बागेची नासधूस…

ByByMahadev Kudav Oct 10, 2026

केंद्रप्रमुख आनंदराव भादवणकर यांचा सेवापूर्ती समारंभ उत्साहात 

सिरसंगी प्रतिनिधी : गवसे-उमगाव, ता. चंदगड येथील केंद्रप्रमुख श्री. आनंदराव शंकर भादवणकर यांच्या ३८ वर्षे ६ महिने ९…

ByByMahadev Kudav Oct 9, 2026

आदर्श हायस्कूल सिरसंगीमध्ये महात्मा गांधी , लाल बहादूर शास्त्री जयंती उत्साहात

सिरसंगी प्रतिनिधी आदर्श हायस्कूल सिरसंगी प्रशालेमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती…

ByByMahadev Kudav Oct 2, 2026

पावसासाठी प्रार्थना करणाऱ्या गणू कसेकर यांचा येमेकोंडकरांकडून सत्कार

सिरसंगी प्रतिनिधी गेल्या दीड महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने यमेकोंड परिसरात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. पावसाअभावी शेतकरी चिंतेत…

ByByMahadev Kudav Oct 2, 2026

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top