आपली बातमी प्रसिद्ध करायची आहे?

स्थानिक बातमी किंवा जाहिरात हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा — जलद आणि विश्वासार्ह.

📲 आत्ताच संपर्क करा
  • Home
  • दैनिक बातम्या
  • एस एस हायस्कूलमध्ये माजी विद्यार्थी व गुणवंत विद्यार्थी गुण गौरव समारंभ
Image

एस एस हायस्कूलमध्ये माजी विद्यार्थी व गुणवंत विद्यार्थी गुण गौरव समारंभ

सिरसंगी प्रतिनिधी
एस एस हायस्कूल नेसरी येथे माजी विद्यार्थी गुणगौरव समारंभ संपन्न झाला या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शिक्षण समिती कसबा नेसरी संस्थेच्या सचिव डॉ अर्चनाताई कोलेकर होत्या. यावेळी आजरा महसूल विभागाचे मोडी लिपीतज्ञ विश्वनाथ रेळेकर यांची मोडी लिपी कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झालेबद्दल सत्कार करण्यात आला . त्याचबरोबर आरोग्य सेवक कुणाल सुतार अग्नीवीर युवराज नाईक यांचा सत्कार करण्यात आला . विश्वनाथ रेळेकर व कुणाल सुतार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले . कोलेकर मॅडमनी विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम केल्याशिवाय यश मिळत नसल्याचे सांगितले . त्यासाठी अभ्यास व खेळाचा अधिक सराव करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले . या गुणगौरव समारंभ प्रसंगी मार्च 2026 एसएससी दहावी बोर्ड परीक्षेत 90 टक्केपेक्षा जास्त गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा व पालकांचा गौरव करण्यात आला त्यामध्ये सुफिया कदीम, कार्तिकी कदम , प्रज्ञा जाधव, वेदिका पाटील ,आदिती वाईंगडे, अनुष्का देसाई, ओंकार जाधव अनिरुद्ध गोरे, श्रेया फडके , यश देसाई पालक सलीम कदिम ,रंजना कदम, अश्विनी फडके, संदीप पाटील, पुंडलिक वाईंगडे , अरुण देसाई, आनंद गोरे यांचा सत्कार करण्यात आला . या कार्यक्रमासाठी प्रशालेचे प्राचार्य एस एच पाटील , उप मुख्याध्यापक एम ए कांबळे, पर्यवेक्षक एस ई सुतार, सर्व शिक्षक शिक्षिका विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाय व्ही तरवाळ व आभार एम ए कांबळे यांनी मांडले.

नेसरी : गुणवंत विध्यार्थीनीचा व पालकांचा सत्कार करताना विशाल रेळेकर .

संबंधित बातम्या

मोरेवाडीत हत्तीचा धुमाकूळ; सिरसंगी परिसरात बिबट्याची दहशत शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

सिरसंगी प्रतिनिधी : आजरा तालुक्यातील मोरेवडी धनगरवाडा येथे हत्तीने धुमाकूळ घातला असून, भातपीक उसपीक व केळी बागेची नासधूस…

ByByMahadev Kudav Oct 10, 2026

केंद्रप्रमुख आनंदराव भादवणकर यांचा सेवापूर्ती समारंभ उत्साहात 

सिरसंगी प्रतिनिधी : गवसे-उमगाव, ता. चंदगड येथील केंद्रप्रमुख श्री. आनंदराव शंकर भादवणकर यांच्या ३८ वर्षे ६ महिने ९…

ByByMahadev Kudav Oct 9, 2026

आदर्श हायस्कूल सिरसंगीमध्ये महात्मा गांधी , लाल बहादूर शास्त्री जयंती उत्साहात

सिरसंगी प्रतिनिधी आदर्श हायस्कूल सिरसंगी प्रशालेमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती…

ByByMahadev Kudav Oct 2, 2026

पावसासाठी प्रार्थना करणाऱ्या गणू कसेकर यांचा येमेकोंडकरांकडून सत्कार

सिरसंगी प्रतिनिधी गेल्या दीड महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने यमेकोंड परिसरात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. पावसाअभावी शेतकरी चिंतेत…

ByByMahadev Kudav Oct 2, 2026

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top