आपली बातमी प्रसिद्ध करायची आहे?

स्थानिक बातमी किंवा जाहिरात हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा — जलद आणि विश्वासार्ह.

📲 आत्ताच संपर्क करा
  • Home
  • ब्लॉग
  • फॅशेन डिझायनर प्रणाली हेब्बाळकरचा हांदेवडीत सत्कार
Image

फॅशेन डिझायनर प्रणाली हेब्बाळकरचा हांदेवडीत सत्कार

सिरसंगी प्रतिनिधी
हंदेवाडी ता .आजरा येथील प्रणाली मोहन हेब्बाळकर हिने डिझाईन क्षेत्रात परदेशात उल्लेखनीय यश संपादन केले बद्दल पत्रकार पुंडलिक सुतार यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला सध्या त्या मुंबई लालबाग येथे वास्तव्यास आहेत. प्रणाली हिने डिझाईन क्षेत्राला विविध स्तरावर उल्लेखनीय यश मिळवून दिलेने तिचेवर संपूर्ण महाराष्ट्रातून कौतुकाचा वर्षाव होतो आहे.अत्यंत साध्या कुटुंबातून आलेल्या प्रणाली यांच्या यशामागे त्यांच्या आई-वडिलांचा मोठा संघर्ष आणि पाठिंबा आहे. सुरुवातीच्या काळात अनेक अडचणी, आर्थिक संघर्ष आणि मर्यादा असूनही त्यांच्या आई-वडिलांनी मुलीच्या स्वप्नांवर विश्वास ठेवत तिला नेहमी प्रोत्साहन दिले.

सुरुवातीला प्रणाली या आपल्या आजोबांच्या जुन्या शिवण मशीनवर काम करत होत्या. त्यानंतर तिच्या वडिलांनी तिचे स्वप्नांना साथ देत आधुनिक नवीन मशीन घेऊन दिली. या नवीन मशीनमुळे त्यांच्या कामाला अधिक वेग मिळाला आणि फॅशेन डिझाईन क्षेत्रात आत्मविश्वासाने पुढे जाण्याची प्रेरणा मिळाली.

बारावीनंतर त्यांनी मुंबईतील रचणा संसद येथे फॅशेन डिझाईनचा तीन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण केला. घरात फॅशेन क्षेत्राशी कोणताही संबंध नसताना स्वतःच्या मेहनतीवर आणि जिद्दीवर तिने फॅशेन इंडस्ट्रीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. या सत्कारावेळी वडील मोहन हेब्बाळकर, आई सौ.रेखा,आजी सुशीला हेब्बाळकर उपस्थित होते.

संबंधित बातम्या

आदर्श हायस्कूल सिरसंगीमध्ये महात्मा गांधी , लाल बहादूर शास्त्री जयंती उत्साहात

सिरसंगी प्रतिनिधी आदर्श हायस्कूल सिरसंगी प्रशालेमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती…

ByByMahadev Kudav Oct 2, 2026

पावसासाठी प्रार्थना करणाऱ्या गणू कसेकर यांचा येमेकोंडकरांकडून सत्कार

सिरसंगी प्रतिनिधी गेल्या दीड महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने यमेकोंड परिसरात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. पावसाअभावी शेतकरी चिंतेत…

ByByMahadev Kudav Oct 2, 2026

वाटंगी येथील पंढरीनाथ पतसंस्थेला १२ लाख ३७ हजारांचा नफा

चेअरमन शिवाजी नांदवडेकर यांची माहिती सिरसंगी प्रतिनिधी वाटंगी येथील श्री पंढरीनाथ सहकारी पतसंस्थेची ३२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा…

ByByMahadev Kudav Sep 27, 2026

सिरसंगी, किणे, वाटंगी, कोळींद्रे परिसरात गणेशाचे उत्साहात स्वागत

सिरसंगी प्रतिनिधी :गणरायाच्या आगमनाने आजरा तालुक्यातील सिरसंगी, किणे, वाटंगी, कोळींद्रे परिसरात भक्तिमय आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.…

ByByMahadev Kudav Sep 14, 2026
1 Comments Text
  • minesgamestake says:
    Your comment is awaiting moderation. This is a preview; your comment will be visible after it has been approved.
    As someone who prefers games with a bit more strategy mixed in I finally found a platform that gets it right. The mine games load fast and the betting limits suit both casual players and high rollers. Payout requests go through within a few hours and I have never had a single issue with verification. minesgamestake
  • Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    Scroll to Top